Monday 3 October 2016

पोरी

*पोरी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*(एका मुलीच्या बापानं आपल्या मुलीला दिलेला एक लाख मोलाचा संदेश आहे आणी तो संदेश मी माझ्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न करतोय.या वेड्या कवीची कवीता वाचून तुमच्या अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.)*

*पोरी,*
तु पुरूष प्रधान संस्कृती
मानल्या जाणाऱ्या
देशात वावरतेय 
हा समाज बावचाळलाय
म्हणुन
तुझ्या या गोड जीवाला जपून रहा.

*पोरी,*
शारीरीक भूकेनं 
भूकेजलेली कुत्री 
या समाजामध्ये वावरत आहेत
म्हणुन
तुझ्या या गोड जीवाला जपून रहा.

*पोरी,*
ही पिसाळलेली कुत्री
तुझ्या अंगावर धावून येतील,
तुझ्या शरीराची लचके तोडतील,
तुझी अब्रू लूटतील,
तुला छिन्न-विच्छन्न करून टाकतील
म्हणुन,
तुझ्या या गोड जीवाला जपून रहा.

*पोरी,*
कोपर्डी व दिल्लीची निर्भया घटना 
तुला माहीत आहे 
त्या दोघींची आर्द किकांळी 
जगाला लाजवेल अशी होती 
त्यामूळे मी तुला सांगतोय 
तुझ्या या गोड जीवाला जपून रहा.

*पोरी,*
हा भारत देश इंग्रजांच्या तावडीतून 
15 आॅगस्ट 1947 साली स्वंतत्र झालाय 
पण तू स्वंतत्र झाली नाहीस.
तु उद्याची एक,
आई आहेस,
बाई आहेस,
ताई आहेस,
पत्नी आहेस
पण त्या आधी
आजची तु
तरूण पोरगी आहेस 
तु आमच्या काळजाचा
तूकडा आहेस 
हे विसरू नकोस.
म्हणुन म्हणतो पोरी
तुझ्या या गोड जीवाला जरा जपून रहा.
               
              *वेडा कवी* 
          *सत्यवान कांबळे*
     मो.नं:-8600243781
   तारीख:-03/10/2016 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पूडे पाठवा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/10/blog-post_52.html

No comments:

Post a Comment