Friday 14 October 2016

माणसं आणी कणसं

ही कवीता नक्कीच काॅलेजच्या मुलांना आवडणार.
---------------------------------
शेतातल्या रान माळाची पाखरं
दिस मावळताना
उडाणटक्या करित
घरट्याकडे परतत होती.

सुगीची कामं उरकून
माय बा
टकूर्यावर कणसं घेऊन
घराकडे परतत होती.

पाखरांचा चिवचिवाट सुरू झाला
ढंगाचा गडगडाट सुरू झाला
विजाचा कडकडाट सुरू झाला
पावसाचा वर्षाव सुरू झाला.

कडब्याचा चिधांडा झाला
कणसाची नासाडी झाली
सरकार काय डोकावून बगेना
माझ्या माय बा चं
आठरा-विश्व दारिद्रय हटता हटेना.

कणसाचा वास उठला
झाडावरच्या पाखरांचा थवा उठला
माणसाची धावपळ उठली
गोठ्यातली जनावरं उपासमारीनं उठली.

त्यावेळची माणसं
आत्ताची ज्वारीची कणसं
ही ज्वारीची कणसं
बाजरीच्या कणसाला जाऊन भिडू लागली
मग बाजरीचं कणीस पण
हळूहळू डुलु लागलं.

डुलता-डुलता कलियुगातल्या,
दोन्ही कणसांचा सहवास वाढला
सहवासाचं रूपांतर
आगळ वेगळं बोलण्यात झालं
आगळ वेगळं बोलण्याचं रूपांतर प्रेमात झाल.

बोलता-बोलता;
आयुष्याचं भान हरपून गेली
आयुष्याची भाकर करपून गेली
आयुष्याला वेगळं वळण लावून गेली
कलियुगातल्या काॅलेजची कणसं
समाजाला सोडून गेली.

जाता-जाता
आयुष्याला वेड लावून गेली
आयुष्याला हुरहूर लावून गेली
चार-चौघांचे मने जिकून गेली.
       
        वेडा कवी
     सत्यवान कांबळे
तारीख:-15/10/2026
मो.नं:-8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.

No comments:

Post a Comment