Saturday 1 October 2016

मेघराजा आणी बळीराजा

*मेघराजा आणी बळीराजा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मेघराजा आणी बळीराजा 
याचं नातं किती जवळचं हाय 
म्हणून तर हे जग
किती सूखकारक हाय

माझा बा त्या बळीराजा बरोबर
शेतामध्ये दिवसभर राबायचा 
म्हणून तर हे जग 
पोटाला पोटभरून अन्न खायचा

चार दिवस झालं 
सूर्य ढगाच्या आड जाऊन
आईच्या खूशी मध्ये 
निवांत झोपला होता

आज ढग मात्र; 
माझ्या बा च्या शेतात 
दिवसभर धो धो रडला होता 
कारण तो जगाचा राजा होता

माझा बा आज 
ढगाच्या रडण्यानं सूखावला 
पण काही दिवसानी आलेलं पीक 
वाया गेलं म्हणून दूखावला

माझ्या
बा चं,
बळीराजाचं आन् 
मेघराजाचं असं नातं हुतं.
           🌹🌹🌹
             *वेडा कवी* 
         *सत्यवान कांबळे*
       मो.नं:-8600243781 
  मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर 
ही कविता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पूडे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/10/blog-post.html

No comments:

Post a Comment