Monday 17 October 2016

माझा बा आणी बा आंबेडकर

*माझा बा आणी बा आंबेडकर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
दिसभर काम करून 
बा थकला हुता 
काम-काम म्हणून
वैतागला हुता...

म्या;
साळा सुटल्यावर घरी  गिलू 
पेपर असल्यामुळं मास्तरनी 
पेपराची फी मागीतली हूती.

म्या आबाला म्हणालू,
आबा;
मास्तरनी 2 रूपये 
पेपराची फी मागीतलीय...

आबा म्हणाला,
आरं पोरा 
आता पैसं नाहिती
पुन्हा दितू म्हणून 
सांग मास्तरला...

आबा घासभर खाऊन
हातरूणावर तिथच लवंढला

म्या मात्र,
रातभर इचार करत हुतू 
पेपरची फी नाही दिली तर 
मास्तर आपल्याला साळतनं
हाकलून देणार हाय...

पाट-पाटं;
बा कुणकूणत हुता
दिसभर काम करून
तापानं फनफनत हुता...

म्या मात्र सकाळी उठून
पेपरची फी न मागता 
तसच साळला गिलू
साळत मास्तरनी पेपराची फी 
नाही दिली म्हणून
साळच्या बाहेर हाकललं...

मास्तरनी बाहेर हाकलल्यावर
त्या दिशी बाहेर बसून 
दिसभर साळा शिकली 
त्यावेळेस मला 
बाबासाहेब आंबेडकर नावाच्या
बा ची आठवण आली...

माझ्या बा नं 
साळच्या बाहेर बसून साळा शिकली 
आणी जगाची राज्यघटना लिहली
बाहेर बसून शिकलेल्या साळवर
आज देशाची राज्यघटना चालतेय
त्या बा ला इसरून कसं चालणार.
             
            वेडा कवी
        सत्यवान कांबळे
  मो.नं:-8600243781 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहित पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://satyawankamble.blogspot.com/2016/10/blog-post_17.html

No comments:

Post a Comment