Wednesday 28 December 2016

पगली


*पगली*
➖➖➖➖➖➖➖➖➖
ये पगली,
तुझ्या सौंदर्याचा 
जास्त आव आणू नकोस 
तुझ्यापेक्षा या जगात 
खूप सुंदर लोकं आहेत

वक्ता काय बोलू शकतो
आणी कवी काय लिहू शकतो
हे उजेड देणार्या सूर्याला पण 
आजपर्यंत कळालेलं नाही
मग तुला काय कळणार आहे             

कारण मी पण कवी आहे
हे तुझ्या भल्या आयुष्यात    
कधी विसरू नकोस

तुझ्या सौंदर्याला  
लाख मोलाची किंमत
तुझ्याकडे असेल 
माझ्याकडे नाही

तूझं लाख मोलाचं सौंदर्य
तुझ्या घरात ठेव 
माझ्या समोर आणू नकोस
माझ्या समोर आणलीस तर
त्याची राख रांगोळी होईल.
         
          *वेडा कवी*
     *सत्यवान कांबळे*
तारीख:-28/12/2016 
मो.नं:-8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे. आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖

http://satyawankamble.blogspot.com/2016/12/blog-post_28.html

Sunday 25 December 2016

चारोळी:27

कवीला कवी आवडते
कळीला कळी आवडते

कुणाला काय आवडते
मला फक्त तू आवडते.

      वेडा कवी 
  सत्यवान कांबळे

चारोळी:26

मनात दाटले
प्रेमाचे धूके

तूझं सौंदर्य पाहून
माझे शब्द झाले मुके.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

चारोळी:25

माझ्या काळजाला
पिळ मारून गेलीस तू
जाताना ह्रदयाचे
तुकडे करून गेलीस तू

        वेडा कवी
   सत्यवान कांबळे

Friday 23 December 2016

चारोळी:-24

काय सांगू माझ्या
दारूड्या बा ची कहाणी
शाळेला जाताना मात्र न चुकता 
खिशातून दयायचा चाराणी

           वेडा कवी
       सत्यवान कांबळे
   मो.नं:-8600243781

Sunday 18 December 2016

दारूडा बा


*दारूडा बा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संध्याकाळी बा घरी 
दारू ढोसून यायचा 
मायला रातभर 
चाबकानं मारायचा

माय मग 
गुरागत वरडायची 
आम्ही मात्र अडगळीच्या खोलीत
दडून बसायचो

बा आमासणी मारायला आल्यावर
लेकरांना मारू नका 
काय मारायचं ते मला मारा
असं रडत-रडत माय 
लोंटागण घालायची

बा नशेत 
रातभर उभंर्यात पडायचा 
दारूचा वासं मग 
अत्तरावाणी घुमायचा

सकाळी बा मायला म्हणायचा 
कूठं-कूठू लागलं बगू 
त्यावेळेस माय 
चाबकाचे वण दाखवायची

चाबकाचे वण बगून 
बा डोळ्यात पाणी आणायचा 
मला माफ कर असं म्हणत 
हुंदक्या देऊन म्हणायचा

माय
इस्कटलेली केसं
वर सरकावत
सौभाग्याचं कुंकू लावून
नव्या उमेदीनं
कामाला लागायची.
      🌹🌹🌹
        *वेडा कवी*
   *सत्यवान कांबळे*
  तारीख:-18/12/2016
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/12/blog-post_18.html

Thursday 15 December 2016

चारोळी:23

ना आहे मोठा  बंगला
ना गाडी आहे अलीशान
नावातच माझ्या अभिमान मोठा
नाव माझे सत्यवान.

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

Wednesday 14 December 2016

चारोळी:22

सांग माझ्या सखीला
तू जाता जाता
सत्यवान तुझा कवी झाला
तुला शब्दात लिहीता लिहीता

         वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Friday 9 December 2016

शिक्षणाचे दिवस


*शिक्षणाचे दिवस*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*(ही कवीता माझ्या बाबतीत सत्य आहे*)
आई,
मी तुला सोडुन शिक्षणासाठी 
दुर गावी निघून आलोय 
तुझी सारखीच
मला आठवण येते.

आई,
ईतभर पोटासाठी
तुला किती झगडावं लागतं 
माझ्या शाळसाठी 
दुसर्याच्या शेतात दिवसभर 
उन्हात काम करावं लागतं.

आई,
मेसचा डबा मिळतोय बाराला 
तोपर्यंत पोट जातय 
भावाच्या भाराला.

आई,
शिक्षण घेताना माझ्या 
पोटाची आबदा होतेय गं
पण तुला मी असं 
कधीच नाही सांगणार
कारण तु माझाच विचार 
करत रडत बसशील.

मला तुला रडवायचं नाही
शाळा मास्तर होऊन 
तुला हसवायचं आहे.

रानातल्या ढेकळात
तुझ्या कष्टाळलेल्या घामाला 
सुखाचं फळ आणायचं आहे.

*(ही कवीता वाचून माझ्या वेड्या मायला कुणीच सांगू नका बर का? ती खुप हळव्या मनाची आहे.)*
                
                 वेडा कवी 
             सत्यवान कांबळे
          तारीख:-18/11/2016 
          मो.नं:-8600243781 
       मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुडे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/12/blog-post.html 

Tuesday 6 December 2016

चारोळी:21

तू स्वप्नात माझ्या येऊनी
रात्रभर माझ्या जवळ बसतेस
अलगद जेंव्हा उघडतात पापन्या
तेंव्हा मात्र तू कुठेच नसतेस?

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे