Friday 30 September 2016

शिक्षणासाठी गाव सोडून राहताना

शिक्षणासाठी गाव सोडून राहताना.....
➖➖➖➖➖➖➖➖➖
(ही कवीता माझ्या काळजातली आहे.हे दिवस मी अनुभवलेले आहेत म्हणून माझ्या कंठातून हे शब्द बाहेर पडले.)

शिक्षणासाठी गाव सोडून राहताना
भरपूर काही सहन करावं लागतं
सहन करता-करता
घरच्यांना व जुन्या मित्र-मैत्रिणींना
आठवावं लागतं...

स्वतःची अभ्यासाची
स्पेशल खोली पण अपूरी वाटते
मात्र;
बारा गावच्या बारा मित्रा बरोबर
रूम करून रहावं लागतं...

घरचं चूलीवरचं गरम पाणी गार वाटतं
रूम मधल्या टाकीतलं
गार पाणी पण गरम वाटतं
रूममधल्या टाकीतलं गार पाणी
गरम समजून अंगावर घेऊन
आई गंऽऽऽऽऽऽ म्हणावं लागतं...

मेसमधल्या ज्वारीची भाकर बघुन
ज्वारीचं कोठार असलेल्या
मंगळवेढा संताच्या भूमीची
मला आठवण येते...

मेस मधलं जेवण बघुन
घरातल्या शिक्यावरच्या टोपलीची
आठवण येते
भुकेच्या आगीनं मेसचं
जेवण पण मला जेवावं लागतं...

रात्री झोपेत दच्चऽऽकण जाग आल्यावर
त्या गोठ्यातल्या जनावरांची,
म्याव म्याव करणाऱ्या मनीची
आणि मोतीराम नावाच्या
कुत्र्याची मला आठवण येते...

मी घरी आजारी पडल्यावर
माझ्या वेड्या मायला सांगायचो
पण आता इथे रूमवर
माझी वेडी माय नाय
आता कुणाला सांगु?
हा प्रश्न मला सारखा पडतो...

वेड्या मायची आठवण आल्यावर
माझ्या डोळ्यात सारखचं पाणी येतं
ते पाणी मला सारखच
शर्टानं पुसावं लागतं...

मात्र;
शिक्षणासाठी गाव सोडून राहताना
भरपूर काही सहन करावं लागतं
सहन करता-करता
घरच्यांना व जुन्या मित्र-मैत्रिणींना
आठवावं लागतं.

            वेडा कवी
        सत्यवान कांबळे
    मो.नं:-8600243781
  तारीख:-28/02/2015
मु.पो.रड्डे ता. मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/09/blog-post_30.html
➖➖➖➖➖➖➖➖➖

Saturday 24 September 2016

चारोळी:13

माझ्या आठवणीचा पाऊस नेहमीच
तिच्या घरासमोर जाऊन बरसतो
मग माझा वेडा चातक पक्षी पावसाच्या
एका थेंबासाठी उगीच एवढा का तरसतो.
               
                वेडा कवी
            सत्यवान कांबळे
        मो.नं:-8600243781

Wednesday 21 September 2016

चारोळी:12

मला माहीत होतं
तिनं मला सोडून जायाचं
तरी पण माझं वेडं मन
तिच्यावर प्रेम करायचं
    
      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Monday 19 September 2016

चारोळी:11

दिवसातून एकदा तरी
तुझ्या घरासमोरून मी जाणार
तू बग नाही तर नाही बग
पण शिट्टी मात्र मारून जाणार
          
           वेडा कवी
       सत्यवान कांबळे
    मो.नं:-8600243781

चारोळी:10

प्रेम प्रेम म्हणून
मला बस्सं झालय आता
म्हणून तर मी तिच्या प्रेमाच्या
चिट्या फाडून टाकल्यात आता.
    
            वेडा कवी
       सत्यवान कांबळे
     मो.नं:-8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर

चारोळी:9

दव हे तुझ्या प्रेमाचे
ओंजळीतून कसा सांडू
काळजाच्या गाभा-यात
घरटे प्रेमाचे मांडू

     वेडा कवी
सत्यवान कांबळे

चारोळी:8

तिची आठवण आली की,
आश्रू येतात दाटून 
तिच्या विचारांचा पूर
फिरून येतो पापण्यांच्या काठून

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे
मो.नं:-8600243781

चारोळी:7

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तुझ्या आठवणीत रडून रडून
मला बस्स झालाय आता
तुझ्या आठवणीच आयुष्यभर
मला आठवायच्यात आता
                ❤
           वेडा कवी
      सत्यवान कांबळे
    मो.नं:-8600243781
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/09/7.html

चारोळी:6

तिनं मला पाहीलं
मी तिला पाहीलं

ती मला पाहून हसली
मी तिला पाहून हसलो

मी तीच्यात गुंतलो
ती माझ्यात फसली
      
       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

चारोळी:1

तू अशी सतत
नको रडू जानू
तूच तर आहेस
या मल्हाराची बानू.
       
    वेडा कवी
सत्यवान कांबळे

चारोळी:2

सोड रे वेड्या मना विचार तिचा
विचार करून ती कांही येणार नाही
जिला अश्रु मागचे प्रेम कळले नाही
तिला विचारातले प्रेम ही निश्चितच कळणार नाही.
               वेडा कवी
          सत्यवान कांबळे
     मो.नं:-8600243781

Sunday 18 September 2016

मी कवी कसा झालो


*मी कवी कसा झालो?*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अशीच एक सुंदर परी होती
तिच्यावर मी खूप प्रेम करायचो
तिच्याच विचारामध्ये गुंतायचो
तिची आठवण आली की, 
प्रेमाच्या कविता गुंफायचो...

दोघांना एकमेकाशिवाय
कधीच करमत नव्हतं
ती आज कुठे आहे
ते मला माहित नव्हत...

पण तिची आजही आठवण आली की,
माझ्या डोळ्यात पाणी येतं
कारण तिच्यावर 
या वेडया कवीचं प्रेम होतं...

एक दिवस दोघांची
अचानकपणे ताटातुट झाली
आणि ती मला 
कायमचीच सोडून गेली...

ती माझ्या आयुष्यात का आली?
मी तिच्यावर प्रेम का केलं?
माझा अनमोल वेळ मी
उगच का वाया घालवला?
असं मला वाटायचं...

आणि अचानक ती मला
एक दिवस बाजारात दिसली
मला बघून काय,कसा आहेस ?
असं विचारत बसली...

मी तिला जड अंत:करणाने
हो बरा आहे, असं म्हणालो 
जाता-जाता ती मला बोलून गेली
अरे कवी कधी झालास ?...

मी डोळ्यातील पाणी
पुसत-पुसत तिला बोललो
तू ज्या दिवशी मला सोडून गेलीस...

त्या दिवसापासून मी
तुझाच विचार करत राहिलो
तुझ्याच विचारामध्ये गुंतत राहिलो
तुझी आठवण आली की,
तुझ्यासाठी प्रेमाचे धागे गुंफत बसलो..

अन् सखे,
त्या दिवसापासून मी कवी झालो
त्या दिवसापासून मी कवी झालो.
           
           वेडा कवी
       सत्यवान कांबळे
   मो.न:-8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कविता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहित पुढे पाठवून वरील फोन नंबरवर फोन करून बोलूही शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://satyawankamble.blogspot.com/2016/09/blog-post_81.html

चारोळी:3

तुझ्या प्रेमात झिंगाट होऊन
मला पण सैराट व्हायचंय
तू बूलेट चालव अन
मला तुझ्या पाठी बसायचंय.
         
         वेडा कवी
     सत्यवान कांबळे
मो.न:-8600243781

Saturday 17 September 2016

चारोळी:4

आज माझे मन उदास होते
काळजाचे रान भकास होते
दिल्या होत्या वेदना तिनेच
जिच्यासाठी सजवले चांदान्यांचे आरास होते.
         
            वेडा कवी
        सत्यवान कांबळे
    मो.नं:-8600243781

माझी माय मला सांगायची

*माझी माय मला सांगायची*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तु लहाण होतास
राहायला घर नव्हतं
आबा आणी मी 
एका पडलेल्या झोपडीत राहायचो
माझी माय मला सांगायची...

माझ्या अंगावर
फाटलेलं लूगडं होतं 
संसारात अठरा विश्व दारिद्र होतं
माझी माय मला सांगायाची...

आमच्या आयुष्याची भोकं 
आबाच्या बनेलला लागलेत
काळवंडलेला संसार आम्ही 
कसतरी ढकलत होतो
माझी माय मला सांगायची...

पावसाचे दिवस होते
पावसाला सूरवात झाली
पावसाचं पाणी आंगणात आलं 
आंगणातील गडूळ पाणी 
म्हणू-म्हणूपर्यत झोपडीत आलं
माझी माय मला सांगायची...

होत्याचं नव्हतं झालं 
झोपडी सगळी भिजून गली
भांडी-कूंडी इस्कटली
संसार सगळा रस्त्यावर आला
माझी माय मला सांगायची...

इस्कटलेली भांडी -कूंडी
मी आणी दिदूनी गोळा केली 
त्या इस्कटलेल्या भांड्याचा 
आम्ही भातूकलीचा खेळ मांडला

माय;
मारायला आली की,
मायचं हळूच लूगडं ओडून 
आम्ही दोघं पळून जायाचो

पडलेलं घर बांधायचं होतं
पडलेला संसार उभा करायचा होता 
तूला शाळेत धाडायचं होतं
दिदूचं लगीन करायचं होतं
हातामध्ये पैसा नव्हता
खायला अन्न नव्हतं
माझी माय मला सांगायची...

मी थोडसं मोठा झालो
थोडं थोडं कळू लागलं
मायनी आणी आबानी 
दिदूच्या आणी माझ्या शाळसाठी 
पाटलाच्या वरच्या शेतात नवं साल धरलं

पाटलानी चाकरीचं पैसं दिलं
दिदूचं लगीन झाल
मला शाळत धाडलं
अंगावरच्या कपड्यावरती 
आबा आणी माय
चाकरीसाठी निघून गेले

जाता जाता माझी माय
मला सांगून गेली
शिकून मोठा साहेब हो
सावकाराचं कर्ज फेडायचं आहे
नवं घर बांधायचं आहे

ही सगळी स्वप्नं उराशी बाळगून
मी रात्रन-दिस अभ्यास करू लागलो
अभ्यास करता करता
माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले

नवं घर बांधायचं आहे
पडलेला संसार उभा करायचा आहे
सावकाराचं कर्ज फेडायचं आहे
मायला लूगडं अन्
आबाला बनेल घ्यायचं आहे

माय आपण झोपडीत राहणारी 
साधी भोळी माणसं
जन्म देणार्या माय भूमीची 
शप्पत घेऊन सांगतो 
त्या झोपडीचं पांग
फेडल्या शिवाय राहणार नाय.
         🌹🌹🌹
           *वेडा कवी*
      *सत्यवान कांबळे*
    मो.नं:- 8600243781  
मू.पो.रडडे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/09/blog-post_9.html

माझा वैतागलेला बा


*माझा वैतागलेला बा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*सत्य घटनेवर आधारीत कवीता*
शिक्षण घेत असताना आपला बा (वडील) आपल्यावर कसा वैतागतो.तसाच माझा पण बा माझ्यावर वैतागला.त्याने मला कसे रागवले तेच शब्द मी माझ्या कवीतेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.तीच कवीता मी तुमच्यासमोर मांडतोय.ही माझी कवीता नक्कीच सगळ्यानी वाचा
👏👏👏👏👏👏👏👏👏👏
ये परदिशा, 
किती सिकतूय रं साळा
बस कर आता तूझी ती साळा 
किती बी सिकलं तर 
काम नाय लागत.

काम लागलं तर बी
इस-इस, तीस-तीस
लाख पैसं मागत्याती
कूठलं आणायचं एवढं पैसं.

एवढं पैसं असतं तर
कशाला आय घालायला
माझ्या लेकराला साळत
घातलू असतू का?

कूठला तर उद्योग
काढून दिला असता 
या माझ्या लेकराला
जर एवढं पैसं असतं
तर याजच सरलं नसतं 
आम्हा म्हाता-म्हातारीला.

आय म्हणाली बा ला.,
कशाला शिव्या देता लेकराला?
बा म्हणाला आयला.,
ये झिपरे तू गप्प बस 
नाही तर तूला बी माहेरला 
जायाचं असेल तर जा 
तुझ्या आय बा कडं पांदी पांदीनं.

उद्या बाजारला जातू;
चार शेळ्या, चार म्हसरं आणतू 
आता राखत हिडांयचं माळानी
आणी तूझी ती *डीएड का बीएड ची डिग्री* 
इथं माळावरच्या कूसळात 
राकेलनं उभ्यानं पेटवायची.

तूझ्या त्या वाट्सप, फेसबूक च्या फोनला बी 
उभ्यानं काडी लावायची 
आणी त्या तूझ्या मोठ्या भावड्याला बी सांग आता झालास तू सायब आता 
या म्हाता-म्हातारीला नीट सांभाळ म्हणावं.
          
                वेडा कवी
            सत्यवान कांबळे
        मो.नं-8600243781
मु.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुडे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/09/blog-post_26.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*महात्मा फुले शिक्षणशास्त्र (बी.एड) महाविद्यालय सांगोला*

तुझे उडणारे मोकळे केस

*तुझे उडणारे मोकळे केस*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आज आतलं मन म्हणतय
कवीता कोणावरती करू 
मग बाहेरलं मन हळूच म्हणतय
पोरींच्या उडणार्या मोकळ्या केसावर कर...

तुझे विस्कटलेली केसं
मला बघून भूरऽऽ-भूरऽऽ उडू लागले
हिकडून एकदा तिकडून एकदा 
मला बघून हसू लागले...

तु सोडलेले मोकळे केस
मला छान वाटतात
मनात वाटतय आत्ताच प्रपोज करावा
पण शब्द ओठावर येउन थांबतात...

तुझे तांबडे केलेले केस 
माझ्या मनाला वेड लावून जातात
तुझे लाल कलेले ओठ 
माझ्या ओठांना स्पर्श करून जातात...

तुझ्या केसांना मी
कधीच ओळखत नव्हतो
तुझ्या उडणार्या मोकळ्या केसांनी
माझी ओळख करून दिली...

तुझे उडणारे मोकळे केस 
म्हणजे शांपूचा फेस
त्या केसांना अन् फेसांना थोडसं आवर 
समाजामध्ये थोडं इज्जत घेउन वावर...

शेवटी,
मी तूला एवढंच म्हणेन
थोडी केसाची वेणी घाल
मधून भांग पाड
कपाळावर टिकली लाव 
कारण तू म्हणजे 
आई बाबाच्या डोक्यावरचं ओझं आहेस.

              *वेडा कवी*
         *सत्यवान कांबळे*
       मो.नं 8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खलील लिंकवर रजिस्टर केली आहे. आवडली तर कवीच्या नावासहीत पूडे पाठवून वरील फोन नंबर बोलूही शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/09/blog-post_68.html