Saturday 17 September 2016

माझी माय मला सांगायची

*माझी माय मला सांगायची*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तु लहाण होतास
राहायला घर नव्हतं
आबा आणी मी 
एका पडलेल्या झोपडीत राहायचो
माझी माय मला सांगायची...

माझ्या अंगावर
फाटलेलं लूगडं होतं 
संसारात अठरा विश्व दारिद्र होतं
माझी माय मला सांगायाची...

आमच्या आयुष्याची भोकं 
आबाच्या बनेलला लागलेत
काळवंडलेला संसार आम्ही 
कसतरी ढकलत होतो
माझी माय मला सांगायची...

पावसाचे दिवस होते
पावसाला सूरवात झाली
पावसाचं पाणी आंगणात आलं 
आंगणातील गडूळ पाणी 
म्हणू-म्हणूपर्यत झोपडीत आलं
माझी माय मला सांगायची...

होत्याचं नव्हतं झालं 
झोपडी सगळी भिजून गली
भांडी-कूंडी इस्कटली
संसार सगळा रस्त्यावर आला
माझी माय मला सांगायची...

इस्कटलेली भांडी -कूंडी
मी आणी दिदूनी गोळा केली 
त्या इस्कटलेल्या भांड्याचा 
आम्ही भातूकलीचा खेळ मांडला

माय;
मारायला आली की,
मायचं हळूच लूगडं ओडून 
आम्ही दोघं पळून जायाचो

पडलेलं घर बांधायचं होतं
पडलेला संसार उभा करायचा होता 
तूला शाळेत धाडायचं होतं
दिदूचं लगीन करायचं होतं
हातामध्ये पैसा नव्हता
खायला अन्न नव्हतं
माझी माय मला सांगायची...

मी थोडसं मोठा झालो
थोडं थोडं कळू लागलं
मायनी आणी आबानी 
दिदूच्या आणी माझ्या शाळसाठी 
पाटलाच्या वरच्या शेतात नवं साल धरलं

पाटलानी चाकरीचं पैसं दिलं
दिदूचं लगीन झाल
मला शाळत धाडलं
अंगावरच्या कपड्यावरती 
आबा आणी माय
चाकरीसाठी निघून गेले

जाता जाता माझी माय
मला सांगून गेली
शिकून मोठा साहेब हो
सावकाराचं कर्ज फेडायचं आहे
नवं घर बांधायचं आहे

ही सगळी स्वप्नं उराशी बाळगून
मी रात्रन-दिस अभ्यास करू लागलो
अभ्यास करता करता
माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले

नवं घर बांधायचं आहे
पडलेला संसार उभा करायचा आहे
सावकाराचं कर्ज फेडायचं आहे
मायला लूगडं अन्
आबाला बनेल घ्यायचं आहे

माय आपण झोपडीत राहणारी 
साधी भोळी माणसं
जन्म देणार्या माय भूमीची 
शप्पत घेऊन सांगतो 
त्या झोपडीचं पांग
फेडल्या शिवाय राहणार नाय.
         🌹🌹🌹
           *वेडा कवी*
      *सत्यवान कांबळे*
    मो.नं:- 8600243781  
मू.पो.रडडे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/09/blog-post_9.html

No comments:

Post a Comment