Sunday 18 September 2016

मी कवी कसा झालो


*मी कवी कसा झालो?*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अशीच एक सुंदर परी होती
तिच्यावर मी खूप प्रेम करायचो
तिच्याच विचारामध्ये गुंतायचो
तिची आठवण आली की, 
प्रेमाच्या कविता गुंफायचो...

दोघांना एकमेकाशिवाय
कधीच करमत नव्हतं
ती आज कुठे आहे
ते मला माहित नव्हत...

पण तिची आजही आठवण आली की,
माझ्या डोळ्यात पाणी येतं
कारण तिच्यावर 
या वेडया कवीचं प्रेम होतं...

एक दिवस दोघांची
अचानकपणे ताटातुट झाली
आणि ती मला 
कायमचीच सोडून गेली...

ती माझ्या आयुष्यात का आली?
मी तिच्यावर प्रेम का केलं?
माझा अनमोल वेळ मी
उगच का वाया घालवला?
असं मला वाटायचं...

आणि अचानक ती मला
एक दिवस बाजारात दिसली
मला बघून काय,कसा आहेस ?
असं विचारत बसली...

मी तिला जड अंत:करणाने
हो बरा आहे, असं म्हणालो 
जाता-जाता ती मला बोलून गेली
अरे कवी कधी झालास ?...

मी डोळ्यातील पाणी
पुसत-पुसत तिला बोललो
तू ज्या दिवशी मला सोडून गेलीस...

त्या दिवसापासून मी
तुझाच विचार करत राहिलो
तुझ्याच विचारामध्ये गुंतत राहिलो
तुझी आठवण आली की,
तुझ्यासाठी प्रेमाचे धागे गुंफत बसलो..

अन् सखे,
त्या दिवसापासून मी कवी झालो
त्या दिवसापासून मी कवी झालो.
           
           वेडा कवी
       सत्यवान कांबळे
   मो.न:-8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कविता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहित पुढे पाठवून वरील फोन नंबरवर फोन करून बोलूही शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://satyawankamble.blogspot.com/2016/09/blog-post_81.html

No comments:

Post a Comment