Wednesday 19 April 2017

चारोळी:68

चिखल आणी माती
याचं नातं किती असतय घट्ट
मी तुझ्या प्रेमात पडलो
तुझ्या विचारात माझं डोकं झालय मठ्ठ

Tuesday 11 April 2017

चारोळी:67

तु अशीच फिरत जा
मला सोडून गावागावाणी
मी तुझ्या आठवणीत फिरतोय
घरची जनावरे घेऊन माळामाळानी

              वेडा कवी
          सत्यवान कांबळे

Saturday 8 April 2017

चारोळी:66

तुझी आठवण आली की
काळीज फिरतय काट्यातून अनवाणी
असं कसं काय घात केला
तुझ्यावर केलेल्या माझ्या प्रेमानी

         वेडा कवी
     सत्यवान कांबळे

चारोळी:65

मी अभ्यासाला बसल्यावर
पुस्तकात तू दिसू लागतेस
पुस्तक डोक्याला घेतल्यावर
आठवणीत घुसू लागतेस

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे

Wednesday 5 April 2017

चारोळी:64


माझ्याकडे जास्त बगू नकोस
नाहीतर येशील गोत्यात
माझ्या बापाला समजलं की
तुला हाणील पोत्यात

       वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Tuesday 4 April 2017

चारोळी:63

तु भेटायला येणार म्हणून
काळीज माझं कडाडून जागं होतं
तू न भेटताच गेलीस तर
स्वतःवर रुसून फुगून जातं

           वेडा कवी
      सत्यवान कांबळे