Monday 8 May 2017

वहीचं कोरं पान

मी तिच्यासाठी
कोर्या कागदावर
रोज कवीता लिहीत बसायचो

ती एक दिवस
मला म्हणाली ,
वहीच्या को-या पानांवर
कवितेचा डाग पडू देऊ नको
पान खराब होऊन जाईल

मी तिला म्हणालो
अगं वेडे
वहीचं कोरं पान
फक्त तुझ्या साठीच आहे

मग
ती मला म्हणाली,
वहीच्या कोर्र्या कागदावर
फक्त मलाच कोरतोस का?
मी होय म्हणालो

मी तिला म्हणालो,
तु वहीचा कोरा कागद आहेस
मी त्या कोर्या कागदावरील रेग आहे
तु पेन आहेस
मी पेनमधली शाई आहे

सये,
आपलं हे आतूट नात्याचं बंधन आहे
या नात्याला,
कधीच डाग पडणार नाही
कधीच खराब होणार नाही
कधीच तडा जाणार नाही.

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

चारोळी:74

एक सुंदर मुलगी होती
तिचं नाव होतं अवी
मी तिच्या प्रेमात पडलो
अन् मी झालो कवी

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Friday 5 May 2017

चारोळी:71

आता होईल तेवढं
तुझ्यावरतीच प्रेम करायचं
झालं गेलं विसरून
आता नवीन संसार मांडायचं

           वेडा कवी
       सत्यवान कांबळे

चारोळी:70

मी तर निर्णय घेतलाय
तुला सोडून जाण्याचं
तु अशीच माझी वाट बगत रहा
मी परत तुझ्याकडे येण्याचं

            वेडा कवी
        सत्यवान कांबळे

Thursday 4 May 2017

चारोळी:69

वेडा पिसा जीव झाला तरी
मी अजूनही तुझ्यावरतीच प्रेम करतो
घरचे काही पण बोलू दे
त्यांचा शब्द मागे टाकून पुढे जातो