Tuesday 6 June 2017

काळीज


              काळीज
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या काळजाच्या तुकड्याला 
माझ्या मायनं तुझ्या साठीच जन्म दिलं 
पण तु एक चूक केलीस 
न सांगताच माझं काळीज नेलं

त्या,
काळजाच्या तुकड्याला
मायनं किती जपलं होतं
तिचं माझं किती प्रेम त्यात लपलं होत 
माझं मलाच माहीत आहे

तुझ्या हातात माझं काळीज ठेऊन
जरा मनसोक्त जगायचं होतं 
आणि एकदा मला तुझ्याकडे बगून 
I Love You म्हणायचं होतं

सये,
जाताना तु माझं
काळीज चोरून नेलीस
घेऊन जायचच होतं ना तुला
पण
फक्त सांगून न्यायचं होतं

सये,
आता जास्त बोलत नाही
कारण
माझ्या ह्रदयाचा ठोका 
लयच वाढलय बग
त्याला शांत करायचं काम
तुझ्याच हातात हाय

हुंदका दाबून ठेऊन
रोज जगत आहे 
तुझ्या परतीची म्या
वाट बघत आहे

सये,
तुला विनंती करतो
सुगंधात प्रेमाच्या 
जरा नाहून ये
एकटीच नको येऊ
माझं काळीज घेऊन ये.
        
        वेडा कवी
    सत्यवान कांबळे
तारीख:06/06/2017
मो.नं:8600243781 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंक वर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2017/06/blog-post.html

Sunday 4 June 2017

चारोळी:73

तिला पाहण्यासाठी मी
तिच्या घरासमोर फिरायचो
ती नाही दिसली की
उन्हात मर मर मरायचो

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

Saturday 3 June 2017

चारोळी:72

तिचं हळवं मन
माझ्या हृदयावरती राज्य करून गेलं
आणि प्रेम म्हणजे आयुष्याचे
एक अविभाज्य घटक बनून गेलं

           वेडा कवी
       सत्यवान कांबळे