Monday 27 February 2017

चारोळी:53

जाऊन जाऊन सये
तु कूठे गं जाशील
दुःख अनावर झाल्यास
अखेर माझ्याकडेच येशील.

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

चारोळी:52

आजवर आपण एकत्र राहिलो
इथून पुढे दुरावतील आपल्या वाटा
मी आजवर नफ्यात राहिलो
पण आज मात्र सर्वात मोठा झाला घाटा

             वेडा कवी
         सत्यवान कांबळे

चारोळी:51

आयुष्याच्या वाटेवर
अशी अनेक वळणं येत राहतील
तू थांबू नको सये
या आठवणी तुझी भेट घेत राहतील

            वेडा कवी
        सत्यवान कांबळे

चारोळी:50

मी हळव्या मनाचा
रडलो ढसा ढसा
तु लपवुनी आपले अश्रू मला म्हणाली
वेडा कवी गप्प बसा गप्प बसा

              वेडा कवी
          सत्यवान कांबळे

चारोळी:49

आपल्या आठवांचा साठा
असेल जन्मा जन्मासाठी
तु आठवशील जेंव्हा सारे
पाणी जमेल अलगद पापण्याकाठी

             वेडा कवी
         सत्यवान कांबळे

Saturday 25 February 2017

चारोळी:48

मी जीवण जगताना
अनेक गोष्टी कमवलो
पण सखे तुझ्या प्रेमात मात्र
मी स्वतःला हि गमावलो

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

Friday 24 February 2017

चारोळी:47

जितकी आलीस तू जवळी माझ्या
तितकीच तू माझ्यापासून दूर गेलीस
पण जाता जाता सखे तू माझ्या
वेड्या मनाला फितूर केलीस

              वेडा कवी
          सत्यवान कांबळे

Monday 20 February 2017

चारोळी:46

तुझ्या गल्लीतून फिरताना
मी पाऊल टाकतो जपून
कारण तुझा बाप बसलाय
माझ्यावर मांजरासारखा टपून

         वेडा कवी   
    सत्यवान कांबळे

चारोळी:45

कधी कधी मला असं वाटतं
तुझ्या घरासमोर झाड बनून रहावं
आणी त्या झाडाला तू दररोज
माझ्या आठवणीचं पाणी घालावं

           वेडा कवी
       सत्यवान कांबळे

Friday 17 February 2017

चारोळी:44

तुच होती सये
माझ्या जीवणाची परी
मग माझ्या प्रेमात तू
का वागली नाही खरी

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

Sunday 12 February 2017

चारोळी:43

माझ्या सोबत आलीस तर
काळजात तुला घर आहे

आणि नकार देणार असचील तर
त्या घराला एक दार ही आहे.

          वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Sunday 5 February 2017

चारोळी:42

माझी सखी
मला नको परी

मनाने हवी आहे
मला फक्त खरी

    वेडा कवी
सत्यवान कांबळे

चारोळी:41

सोडून जाऊ नकोस रे जानू
तुला किती वेळा सांगू

देवाला साकडे घालते रोज
त्यात तुला काय मागू

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

चारोळी:40

असा कसा मी
तूझा गैरसमज करू

तुझ्या आठवणीत मी
किती किती मरू

     वेडा कवी
सत्यवान कांबळे

Saturday 4 February 2017

चारोळी:39

तु माझ्या आयुष्यात येण्याने
अलगद मी सुखावलो

तूझ्या निघून जाण्याने
मी फार दूखावलो

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

चारोळी:38

मी आता ठरवलंय
तिच्याच गल्लीतून फिरायचं

ती नाही दिसली की
हट्ट धरून बसायचं

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

चारोळी:37

माझ्या आयुष्यात
अशी कशी गं तु आलीस?

अन् मला अर्ध्यावर
का तु सोडून गेलीस?

         वेडा कवी
     सत्यवान कांबळे

चारोळी:36

मी फक्त ऐकून होतो
जवळ येतात दुरावतात माणसं

तू अशी वागलीस तर
स्वप्नं तुटेल माझं छानसं

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे