Wednesday 23 October 2019

चारोळी:213

जिच्यासाठी रात्रभर जागायचो 
ति मात्र कायमची सोडून गेली 
तिला माझी कदर नव्हती
म्हणून दगा देऊन गेली.

     वेडा कवी 
 सत्यवान कांबळे

Friday 20 September 2019

चारोळी212

तु कशी पण रहा                                      
पण दिसतेस खुप छान                         
तुला बगता छणी                                           
माझे हरपुन जाते भान.

    वेडा कवी 
सत्यवान कांबळे

Tuesday 11 June 2019

चारोळी:211

तुझ्या आठवणीत मी
आता थकलो आहे.
सुंदर अशा चेहर्याला
कधीच मुकलो आहे.

    वेडा कवी
सत्यवान कांबळे

चारोळी:210

आभाळ भरून आल्यावर
तुझीच आठवण येते
तुझ्या भेटीचा तो छन
खुप काही सांगून जाते.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Friday 7 June 2019

तिच्या गावावरून जातांना

तिच्या गावावरून जातांना,
वाटायचं मध्येच बस थांबवावी
आणी जावं तिच्या घरी
आणि बोलावं मनमोकळेपणाने
वाटलच तर चार थेंब अश्रूही गाळावं
तिच्या मांडीवरती...

तिच्या गावावरून जातांना,
मधेच एक नदी लागायची
बसमधून उतरावं
आणी तिला नदीकाठी बोलवून
खुप गप्पा माराव्या...

चारोळी:209

चारोळी

तिचं घर तळ्यात
माझं घर मळ्यात
तरी पण ती पडली
माझ्या गळ्यात.

वेडा कवी
सत्यवान कांबळे

चारोळी:208

तुला काहीच वाटणार नाही
मला सोडून गेल्यावर,
आठवण मात्र नक्की येईल 
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर.

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे

Saturday 27 April 2019

चारोळी:207

तिच्या घरासमोरून जातांना
ती दारात उभी दिसली
मला बगताच छणी
गालातल्या गालात खुदकन हसली.

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

Thursday 25 April 2019

चारोळी:206

दगाबाज माणसं या माय भूमीवर
जन्माला येतात तरी कशाला.
जाताना आठवणी ठेवून जातात
काळजाच्या उशाला.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Friday 22 March 2019

चारोळी:205

तिच्या एका भेटीसाठी
हा किती तरसायचा
दोघांच्या भेटीच्या दरम्यान
हा पाऊस मध्येच बरसायचा.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Monday 18 March 2019

चारोळी:204

ती विचार करत नाही
मग आठवणीत का मरायचं ?
तिचं देणं ना घेणं
आठवण काढून का झुरायचं?

    वेडा कवी
सत्यवान कांबळे

Sunday 17 March 2019

चारोळी203

आयुष्यात आलीस
माझ्या एका वळणावर
जाताना ह्रदयाला ठेवून गेलीस 
एका जळत्या सरणावर.

    वेडा कवी
सत्यवान कांबळे

Tuesday 5 March 2019

चारोळी:202

माझ्या पुस्तक प्रकाशनाला
कदाचित तु नसणार
त्या दिवशी तु नाही याची उणीव
मात्र नक्कीच भासणार.
         
     वेडा कवी
सत्यवान कांबळे

Wednesday 13 February 2019

चारोळी:201

येईन ना येईन 
पुन्हा तुझ्या भेटीला 
आठवणी ठेव मात्र 
काळजाच्या गाठीला.
   
    वेडा कवी 
सत्यवान कांबळे 

Friday 18 January 2019

होय मी वेडा कवी आहे

मी एक साधा माणूस
पण माझ्या मायनं मला
कवी म्हणून जन्म दिला 
म्हणून मी वेडा कवी आहे...

कवी कोण पण
होऊ शकत नाय
जन्म देणार्या मायचं
रक्तच कवी असावं लागतं...

मग मायच्या आशिर्वादाने
मी कविता करू लागलो
कधी माय वरती,
कधी सूर्य, चंद्रावरती
कधी माय भूमीवरती...

कधी-कधी माझं मन
नटलेल्या सूंदर परिवरती, 
तिने मोकळे सोडलेल्या 
केसातील गजर्यावरती
अन तिच्या पायातील पैंजनकडे जाऊ लागलं...

कधी-कधी  
पोटाची खळगी भरण्यासाठी
लेकराला सोडून
ऊस तोडीला जाणार्या 
त्या माय बापाकडं जाऊ लागल...

म्हणून मी मान्य करतो
होय मी वेडा कवी आहे 
कवीता करण्यासाठी मन मात्र
वेडच करावं लागतं 
कवी होण्यासाठी मायचं रक्तचं
कवी असावं लागतं...

कधी माझं वेडं मन
फूटपातवर झोपलेल्या
माय लेकराकडं जायचं
माय मूझे एक रोटी दे ना
असं म्हंटल्यावर 
माझं काळीज धास्सऽऽऽ करायचं
मग मी त्यांच्यावरती कविता करायचो
मग मी वेडा कवी व्हायचो...

कधी माझं वेडं मन
एकमेकावर जिवापाड प्रेम करणार्या
जोडप्याजवळ जाऊन बसायचं
त्याचं चोरून बोलणं ऐकायचं
अन त्यांच्या कानात हळूच सांगायचं
प्रेम नकारे करू 
दिल तूट जाता है...

मग मी प्रेमात गुदमरलेल्या
जोडप्यावर कविता करायचो 
मग मी वेडा कवी व्हायचो...

मी कविता करण्यासाठीच
फक्त वेडा आहे
ज्यावेळेस माझ्या कविता
लिहून पूर्ण होतील
त्यावेळेस माझ्या कविता
तुम्हांला वेड लावतील...

म्हणून म्हणतात ना रे
जो देखे ना रवी
ओ देखे कवी
म्हणून मी वेडा कवी.

     वेडा कवी
 सत्यवान कांबळे
मो.नं 8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कविता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवून वरील नंबरवर फोन करून बोलूही शकता.