Sunday 30 September 2018

चारोळी:171

तिला भेटण्यासाठी
हा रोज तरसायचा
अन ऐन भेटीवेळी
हा पाऊस मध्येच बरसायचा.

     वेडा कवी
  सत्यवान कांबळे

चारोळी:170

गुलाबाला पण खबर लागलीय,
तू मला सोडून गेल्याची 
एकांतात बसून प्रार्थना करतोय
तू परत येण्याची.
        
          वेडा कवी 
      सत्यवान कांबळे

Friday 28 September 2018

चारोळी:169

तुम्ही दोघे सुखी रहा
मी राहीण तुमच्यापासून लांब
सदैव उभा राहीण तुमच्यासाठी
म्हणून एक पाण्यातलं खांब

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

Tuesday 25 September 2018

चारोळी:159

ह्रदयावर घाव करून
ती सोडून गेली
विसरणार नाही कधीच
हा शब्द मोडून गेली.

    वेडा कवी
सत्यवान कांबळे

Sunday 23 September 2018

चारोळी:168

झाल्या असतील चुका माझ्याकडून
तर मला माफ कर
तुझ्या मनात काय असेल तर
ह्रदय तुझं साफ कर.

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे

Saturday 22 September 2018

चारोळी:167

निरोप घेतो सये,
तुझी परवानगी घेऊन
निघून जाईन दुर
काळीच तुझ्या हातात देऊन.

     वेडा कवी
सत्यवान कांबळे

शिक्षणासाठी गाव सोडून रहाताना

शिक्षणासाठी गाव सोडून राहताना.....
➖➖➖➖➖➖➖➖➖
(ही कवीता माझ्या काळजातली आहे.हे दिवस मी अनुभवलेले आहेत म्हणून माझ्या कंठातून हे शब्द बाहेर पडले.)

शिक्षणासाठी गाव सोडून राहताना
भरपूर काही सहन करावं लागतं
सहन करता-करता 
घरच्यांना व जुन्या मित्र-मैत्रिणींना
आठवावं लागतं...

स्वतःची अभ्यासाची
स्पेशल खोली पण अपूरी वाटते 
मात्र;
बारा गावच्या बारा मित्रा बरोबर
रूम करून रहावं लागतं...

घरचं चूलीवरचं गरम पाणी गार वाटतं 
रूम मधल्या टाकीतलं 
गार पाणी पण गरम वाटतं
रूममधल्या टाकीतलं गार पाणी 
गरम समजून अंगावर घेऊन
आई गंऽऽऽऽऽऽ म्हणावं लागतं...

मेसमधल्या ज्वारीची भाकर बघुन
ज्वारीचं कोठार असलेल्या
मंगळवेढा संताच्या भूमीची
मला आठवण येते...

मेस मधलं जेवण बघुन
घरातल्या शिक्यावरच्या टोपलीची 
आठवण येते 
भुकेच्या आगीनं मेसचं 
जेवण पण मला जेवावं लागतं...

रात्री झोपेत दच्चऽऽकण जाग आल्यावर
त्या गोठ्यातल्या जनावरांची,
म्याव म्याव करणाऱ्या मनीची
आणि मोतीराम नावाच्या
कुत्र्याची मला आठवण येते...

मी घरी आजारी पडल्यावर 
माझ्या वेड्या मायला सांगायचो 
पण आता इथे रूमवर 
माझी वेडी माय नाय
आता कुणाला सांगु?
हा प्रश्न मला सारखा पडतो...

वेड्या मायची आठवण आल्यावर 
माझ्या डोळ्यात सारखचं पाणी येतं
ते पाणी मला सारखच 
शर्टानं पुसावं लागतं...

मात्र;
शिक्षणासाठी गाव सोडून राहताना
भरपूर काही सहन करावं लागतं
सहन करता-करता 
घरच्यांना व जुन्या मित्र-मैत्रिणींना
आठवावं लागतं.
           
            वेडा कवी
        सत्यवान कांबळे
    मो.नं:-8600243781 
  तारीख:-28/02/2015 
मु.पो.रड्डे ता. मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/09/blog-post_30.html
➖➖➖➖➖➖➖➖➖

Friday 21 September 2018

चारोळी:166

तिची जवळीकता,
माझ्या मनाला बांधून गेली
प्रेमात विरह काय असतो
जाताना मात्र सांगून गेली.

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

Thursday 20 September 2018

चारोळी:-165

तुझ्या ओठावर
माझंच नाव असावं
माझ्या आयुष्यात
तुझ्याशिवाय कोणीच नसावं.

      वेडा कवी
   सत्यवान कांबळे

चारोळी:164

तिची जवळीकता
मनाला भावून गेली
प्रेमात विरह काय असतो
जाताना मात्र दाऊन गेली.

         वेडा कवी
     सत्यवान कांबळे

चारोळी:163

आठवण तुझी आल्यावर,
बागेत फिरून येतो
तु नाही दिसली की
नव्याने झुरून येतो.

     वेडा कवी
सत्यवान कांबळे

Monday 17 September 2018

चारोळी:162

नकळत तिच्याकडे वळलो
भावनेच्या भरात
ती चुक सतत सलते
ह्रदयाच्या घरात.

    वेडा कवी
सत्यवानकांबळे

Saturday 15 September 2018

चारोळी:161

ठरवलं आता मी
तुझ्या आठवणीना आवरायचं
आठवण जरी आली
पाणावलेल्या डोळ्यांनी सावरायचं.

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

Monday 10 September 2018

चारोळी:160

तिच्या जवळ गेल्यावर
मला आवडत नाही म्हणायची
काॅलेजमधे गेल्यावर मात्र
टक लावून माझ्याकडेच बघायची.

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे

चारोळी:158

ती प्रतेकवेळी म्हणायची
तुझ्या शब्दाला आहे धार
मी काहीच करू शकत नाही
माझे शब्द करतात तिच्यावर वार.

         वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Friday 7 September 2018

चारोळी:157

कडाक्याच्या भांडणात
ती गेली रुसून
तिच्या आठवणीत आजही रडतोय 
गुलाबी बागेत एकातांत बसून.
     
          वेडा कवी 
      सत्यवान कांबळे

Thursday 6 September 2018

चारोळी:156

तुझ्या-तुझ्या गुंगीत 
कुठे गेलीस रुसून
तुझी वाट पाहतय
फुलपाखरू बागेत बसून.
     
     वेडा कवी 
सत्यवान कांबळे

Sunday 2 September 2018

चारोळी:155

किती मनापासून जपली होती
आपली ही गोड नाती
तुझा रुसवा-फुगवा काढण्यातच
माझ्या आयुष्याची झाली माती.

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे