Tuesday 28 August 2018

आयुष्याच्या वळणावर

जीवन खूप सुंदर आहे 
ते आंनदाने जग
प्रेमाने जग
हळव्या मनाने जग...

जगता-जगता
कोणाच्या हृदयात 
आयुष्याचं घर करून 
राहता येतयं का बग...

जीवन म्हणजे,
लहान बाळाची खेळणी,
नवरा बायकोचा संसार
आयुष्याचा सुंदर रथ...

तुझं लाख मोलाचं प्रेम 
कोणाला देता येतय का बग 
घेता येतय का बग 
प्रेमाने जग जिंकता येतय का बग...

आपलं प्रेम बहरत असतानाच 
मी दु:खी अंतकरणाने 
शेवटी तुझा निरोप घेतला...

त्या वेळेस तु मला बघुन
दिवसभर रडली होतीस  
रडता-रडता 
मला दुःखी अंतकरणाने
बोलुन गेली होतीस...

आयुष्याला सांभाळ
विचारांना सांभाळ 
तुझ्या या हळव्या मनाला 
कधीच त्रास करून घेऊ नकोस
आपल्या काॅलेजच्या ग्रुप मधला फोटो 
तुझ्या घरामध्ये लावून घे
कारण घरातून बाहेर येता जाता 
मी तुला नक्कीच त्या फोटोमध्ये दिसेन...

या जन्मी मी तुझी 
नाही होऊ शकले
पुढच्या जन्मी  
नक्कीच मी तूझी होईन
असं म्हणून तू 
माझा निरोप घेतलास...

ज्या ठिकाणी तू मला
पहिल्यांदा भेटलीस
त्याच जुन्या वळणावरती 
आज मी हातामध्ये गुलाबाचं 
फुल घेऊन उभा आहे...

कारण,
तू मला 
कोणत्या ना कोणत्या 
रूपाने भेटशील 
याच आशेने मी उभा आहे...

पण त्या ठिकाणी
तु मला कधीच दिसत नाहीस
त्या प्रेमाच्या जुन्या वळणावरती 
मला एक वेगळच 
रोज नवीन जोडपं दिसतं...

त्यावेळेस माझ्या तोंडातून 
शब्द फुटेनासे होतात
मग मी तुझा 
विचार करत घरी येत असताना
वाटेमध्ये मला एक 
वेगळाच प्रश्न पडतो...

ती कुठे गेली?
मी कुठे गेलो?
माझं हळवं मन कुठे गेलं?
तिच्या आयुष्याला वेड लावणारे 
माझे विचार कुठे गेले?

हा सगळा विचार 
करत असताना
घर कधी येतय 
हे माझं मलाच कळत नाही...

शेवटी मी तुला एवढेच म्हणेन
आयुष्याच्या नव्या वळणावर
तु जात असताना
जुन्या वळणावरच्या 
गावाकडल्या मातीतल्या 
तुझ्या त्या हळव्या मनाच्या मित्राला 
कधी सुध्दा विसरू नकोस...

दिल्या घरी तू सूखी रहा
दिल्या घरी तू सूखी रहा.
           
          वेडा कवी
      सत्यवान कांबळे
   मो.नं:-8600243781 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कविता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवून वरील फोन नंबर फोन करून बोलूही शकता.

Saturday 25 August 2018

दुष्काळाचं आभाळ


*दुष्काळाचं आभाळ*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*(आज रक्षबंधनाचा सन भाऊ बहिणीचं नातं असच वाढत जाओ म्हणून ती बहीण त्या आपल्या भावाला राखी बांधत असते.आणी आपल्या हातून जेवढी ओवाळणी होईल तेवढी तो देत असतो.पण त्याच बहिणीची लग्न झाल्यावर कशी तारांबळ उडते ती तारांबळ मी माझ्या कवितेतून तुमच्यासमोर मांडतोय.)*

बा च्या मनात 
दुस्काळाचं आभाळ
दाटून आलं व्हतं...

सगळीकडं दुस्काळाचं
थैमान माजलं 
अन् त्यात पोरीचं लगीन आलं

बा पोरीच्या लग्नासाठी 
पैशाची जूळवा-जुळव करत 
सैरा-वैरा धावत हुता...

लग्नासाठी बा नं
गोठ्यातली जनावरं विकली 
पैशाची जुळवा-जुळव झाली 
पोरीचं लगीन ठरलं 
लगीन झालं 
पोरगी सासरी नांदायला गेली
पण पोरीचा दादला(नवरा) दारूडा निघाला...

पोरीचा अधून-मधून 
बा ला फोन यायचा 
सगळी हकीकत पोरगी
बा ला फोनमध्ये सांगायची
बा कूणाला न सांगता 
हातरूणात हुंदक्या देऊन रडायचा...

दादला पोरीला
रातभर दारू पिऊन मारायचा 
पोरगी सकाळी उठून 
वायरची पिशवी हातात घेऊन
पांदि-पांदीनं माहेरला निघायची...

आलेली रात कशी तरी ढकलायची 
सकाळी उठून मायच्या हातची 
असेल ती चटणी भाकर खाऊन
शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या गाठी भेटी घ्यायची..
आणी बा च्या गळ्यात पडून 
मोठ मोठयाने रडायची...

बा गळयात पडूनच पोरीला म्हणायचा,
*दिली तवाच मेलीस*
स्वतःच्या नशिबाला दोष देत
पोरगी पुन्हा सासरचा रस्ता धरायची...

त्या वेळेस
बा च्या डोळ्यात
दुस्काळाचं आभाळ
गच्च भरून यायचं.
             
            वेडा कवी
         सत्यवान कांबळे
     तारीख:23/01/2017 
      मो.नं:-8600243781 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुडे पाठवून वरील फोन नंबरवर फोन करून बोलूही शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2018/08/blog-post_25.html

Tuesday 21 August 2018

चारोळी:154

तिनं त्याच्याशी बोलत
माझ्या मनाला फसवलं
मिळून अभ्यास करू म्हणत
माझ्या अभ्यासाला कोपर्यात बसवलं

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे

चारोळी:153

तु सोडून गेल्यावर
रात्रभर रडलो होतो
आसवाच्या एकेका थेंबात
मी आकंठ बुडलो होतो

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Saturday 18 August 2018

बाप

*बाप*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*(माय भुमीवरच्या बापाची वेदना मांडणारी कवीता मी आज तुमच्यासमोर सादर करतोय.या कवीतेतील मी,माझी प्रियशी,शेजारचा गणू काका आणी माझा बाप ही पात्रं खरी नसून काल्पनिक आहेत पण समाजामध्ये असं घडतं हे मात्र नक्की.)*

माय आणी आबा 
दिस मावळताना 
काम करून 
घरी परतत हुती

पाखरांचा चिवचिवाट 
ढगांचा गडगडाट सुरू झाला
विजाही चमकू लागल्या 
अन् त्यात पावसालाही सुरवात झाली

अन् ज्या-ज्या वेळेस पाऊस पडतो
त्या -त्या वेळेस त्या रिमझिमत्या पावसात 
माझी प्रेयसी आठवत नसून 
माझा बापच मला आठवतो

कारण,
त्या शेजारच्या गणू काकानं 
गेल्या वर्षी पाऊसा अभावी 
आलेलं पिक वाया गेलं म्हणून
आत्महत्या केली हुती

तवापासनं 
म्या बी धस्का खाल्लाय 
बा शेताला गेल्यावर 
म्या बी मागं मागं जातू
अन् बा ची नजर चुकवत 
दावणीतला कासरा झाकून ठिवतू

शेतातलं काम उरकून
घरी येताना 
म्या बी बा च्या मागं मागं इतू

अन् रात्री बा झोपुस्तर
म्या बी झोपत नाय
झोप लागेल या भितीपोटी 
संध्याकाळी म्या बी जेवत नाय

मित्रानो,
खरं खरं सांगू 
आता हल्ली पाऊसही पडत नाय 
पाऊस जरी नाही पडला
पावसा अभावी पीक वाया गेलं म्हणून
मरगळलेल्या बापाला
मी आता आठवूही देत नाय.
         
         *वेडा कवी*   
      सत्यवान कांबळे 
   मो.नं:8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा.जि.सोलापूर 
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.
आवडली तर कवीच्या नावासहित पुढे पाठवून वरील नंबरवर काॅलही करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2018/08/blog-post_18.html

कथा:गावाकडची आठवण

            गावाकडची आठवण

आज स्वप्नात तिच्या गावी जाऊन आलो.
गावभर फिरलो पण ती मला कुठेच दिसली नाही.
एक बिचारा पोरगा माझ्याकडे माझ्या वेदना जाणून घेण्यासाठी धावत-धावत पळत आला आणी तिचं लग्न झालय आणी ती सासरी नांदायला निघून गेली आहे असं पटकन सांगून निघून गेला.
मी पाणाविलेल्या डोळ्यांनी घरी परतलो अन् पटकण जाग आली.

       

Friday 17 August 2018

चारोळी:152

पाऊस पण बग ना
किती दिवसातून पडला
तिची आठवण आली म्हणून
तो ढसा-ढसा रडला.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे