Saturday 18 August 2018

बाप

*बाप*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*(माय भुमीवरच्या बापाची वेदना मांडणारी कवीता मी आज तुमच्यासमोर सादर करतोय.या कवीतेतील मी,माझी प्रियशी,शेजारचा गणू काका आणी माझा बाप ही पात्रं खरी नसून काल्पनिक आहेत पण समाजामध्ये असं घडतं हे मात्र नक्की.)*

माय आणी आबा 
दिस मावळताना 
काम करून 
घरी परतत हुती

पाखरांचा चिवचिवाट 
ढगांचा गडगडाट सुरू झाला
विजाही चमकू लागल्या 
अन् त्यात पावसालाही सुरवात झाली

अन् ज्या-ज्या वेळेस पाऊस पडतो
त्या -त्या वेळेस त्या रिमझिमत्या पावसात 
माझी प्रेयसी आठवत नसून 
माझा बापच मला आठवतो

कारण,
त्या शेजारच्या गणू काकानं 
गेल्या वर्षी पाऊसा अभावी 
आलेलं पिक वाया गेलं म्हणून
आत्महत्या केली हुती

तवापासनं 
म्या बी धस्का खाल्लाय 
बा शेताला गेल्यावर 
म्या बी मागं मागं जातू
अन् बा ची नजर चुकवत 
दावणीतला कासरा झाकून ठिवतू

शेतातलं काम उरकून
घरी येताना 
म्या बी बा च्या मागं मागं इतू

अन् रात्री बा झोपुस्तर
म्या बी झोपत नाय
झोप लागेल या भितीपोटी 
संध्याकाळी म्या बी जेवत नाय

मित्रानो,
खरं खरं सांगू 
आता हल्ली पाऊसही पडत नाय 
पाऊस जरी नाही पडला
पावसा अभावी पीक वाया गेलं म्हणून
मरगळलेल्या बापाला
मी आता आठवूही देत नाय.
         
         *वेडा कवी*   
      सत्यवान कांबळे 
   मो.नं:8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा.जि.सोलापूर 
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.
आवडली तर कवीच्या नावासहित पुढे पाठवून वरील नंबरवर काॅलही करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2018/08/blog-post_18.html

No comments:

Post a Comment