Thursday 26 January 2017

चारोळी:35

मी दिवसभर माणसं वाचतो
रात्री पुस्तकं वाचतो

माणसाच्या अन् पुस्तकाच्या आधारावर 
सखे मी तुझ्यावरतीच कवीता लिहतो

       वेडा कवी
  सत्यवान कांबळे
मो:-8600243781

Monday 23 January 2017

चारोळी:33

मी आठवण नावाचं
पुस्तक वाचत बसलो होतो

त्या पुस्तकात तुझ्या आठवणीनं
मी मनातल्या मनात रडून गेलो होतो

           वेडा कवी
      सत्यवान कांबळे

चारोळी:34

कधी कधी मनात असं वाटतय
तिला रस्त्यात आडवावं का?

अन् तिला एकदाच विचारून टाकावं
तु माझ्यावर प्रेम करणार का ?
     
          वेडा कवी
     सत्यवान कांबळे

दुस्काळाचं आभाळ

➖➖➖➖➖➖➖➖➖
दुस्काळाचं आभाळ
➖➖➖➖➖➖➖➖➖
बा च्या मनात
दुस्काळाचं आभाळ
दाटून आलं व्हतं...

सगळीकडं दुस्काळाचं
थैमान माजलं
अन् त्यात पोरीचं लगीन आलं

बा पोरीच्या लग्नासाठी
पैशाची जूळवा-जुळव करत
सैरा-वैरा धावत हुता...

पोरीच्या लग्नासाठी बा नं
गोठ्यातली जनावरं विकली
पैशाची जुळवा-जुळव झाली
पोरीचं लगीन ठरलं
लगीन झालं
पोरगी सासरी नांदायला गेली
पण पोरीचा दादला(नवरा) दारूडा निघाला...

पोरीचा अधून-मधून
बा ला फोन यायचा
सगळी हकीकत पोरगी
बा ला फोनमध्ये सांगायची
बा कूणाला न सांगता
हातरूणात हुंदक्या देऊन रडायचा...

दादला पोरीला
रातभर दारू पिऊन मारायचा
पोरगी सकाळी उठून
वायरची पिशवी हातात घेऊन
माहेरला निघायची...

आलेली रात कशी तरी ढकलायची
सकाळी उठून मायच्या हातची
असेल ती चटणी भाकर खाऊन
शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या गाठी भेटी घ्यायची..
आणी बा च्या गळ्यात पडून
मोठ मोठयाने रडायची...

स्वतःच्या नशिबाला दोष देत
पोरगी पुन्हा सासरचा रस्ता धरायची...

त्या वेळेस
बा च्या डोळ्यात
दुस्काळाचं आभाळ
गच्च भरून यायचं.

             वेडा कवी
         सत्यवान कांबळे
     तारीख:23/01/2017
      मो.नं:-8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुडे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2017/01/blog-post_23.html
➖➖➖➖➖➖➖➖➖

Monday 9 January 2017

ती सध्या काय करते...?

ती सध्या काय करते...?
➖➖➖➖➖➖➖➖➖
ती सध्या काय करते...?
तर आजही
गावात असो वा शहरात
फक्त आणि फक्त
कष्टच करते

सकाळी लवकर उठते 
जनावराचं शाण-घाण काढते 
भाकर-तुकडा करते 
आणी बाबळीच्या झाडाखाली विसावलेल्या 
बापाला भाकरी नेऊन देते

ती सध्या काय करते...?
डोक्यावर बोचकं घेते 
हातामध्ये पिशवी घेते 
काकेत लेकरू घेते 
कोणीतरी वाढलेली शिळी भाकर 
आणी त्यावर लावलेली चटणीचा ठेसा 
खात-खात केसावरती फूगं, सुया, बिबं
म्हणत-म्हणत गावो-गावी फिरते

ती सध्या काय करते...?
नोकरी करते 
चाकरी करते
लेकरा-बाळांच्या शिक्षणासाठी 
दिवसभर उन्हात काम करते

ती सध्या काय करते...?
दुसर्याची धुणी-भांडी करते 
हाॅटेलात काम करते
रेल्वे-स्टेशनवर न्यूज पेपर विकते
दिवस मावळताना झोपडीकडे येते

ती सध्या काय करते...?
निवडणूकीला उभी राहते 
निवडून येते 
तिचा कारभार तिचा नवरा पाहतो 
सही कर म्हणील त्या ठिकाणी सही करते.

ती बिचारी माय, 
अजून बरेच काय करते 
ते कुणालाच दिसत नाही 
अन शब्दात बसेल एवढं 
मलाही मांडता येत नाही
आणि अजूनहि शोध बाकी आहे 
ती सध्या काय करते...?

पण,
मला आज एक प्रश्न पडला आहे 
तिच्या डोक्याला लावायला तेल नसते 
ती एवढी धडपड कुणासाठी करते?

             वेडा कवी
        सत्यवान कांबळे
       तारीख:-09/01/2017
     मो.नं:-8600243781 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर कली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2017/01/blog-post_9.html
➖➖➖➖➖➖➖➖➖

Saturday 7 January 2017

चारोळी:32

मला माहीत नाही
ती सध्या काय करते

पण ज्या ठिकाणी आहे
तिथे माझ्याच नावाने झूरते.

         वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Friday 6 January 2017

चारोळी:31

खुप काही सोसिले मी आता
ह्रदयावरी माझ्या घाव झाले

प्रेमाचा अर्थच मला माहीत नव्हता
तुझ्या प्रेमाने मला जागे करून दिले.

              वेडा कवी
         सत्यवान कांबळे

Thursday 5 January 2017

तु रडू नकोस गं माझी माय

*तु रडू नकोस गं माझी माय*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तु रडू नकोस गं माझी माय 
तुझ्याशिवाय या वेड्या जगात 
माझं कोण हाय

जन्म देणार्या माय भूमीची 
शप्पथ घेऊन सांगतो माय 
घरामध्ये भाकरीचा तुकडा 
नसला  तरी चालेल

पण,
तु रडू नकोस गं माझी माय
तूझ्या शिवाय या वेड्या जगात
माझ कोण हाय...

माय
मी शिक्षणासाठी तुला सोडून 
दुर देशी निघून चाललोय
तूझी आठवण आल्यावर 
माझं मन व्याकूळ होतं 
त्यावेळेस मी कुणाला सांगू

मी शिक्षण घेताना
समाज तूला काय पण बोलेल 
त्यांच कधी पण मनावर घेऊ नकोस
शिक्षण घेताना माझं 
किती पण हाल होऊ दे

पण;
तु रडू नकोस गं माझी माय 
तुझ्या शिवाय या वेड्या जगात
माझं कोण हाय

दिदूला सारखं मारू नकोस 
तिला तर तुझ्याशिवाय कोण हाय 
बाबा तर जगाचा पोशिंदा हाय 
दिवसभर काम करून पोट भरणं 
हाच त्याचा धंदा हाय ...

बाबा दिवस मावळून
शेतातून घरी आल्यावर 
त्यांना हात पाय
धुयाला गरम पाणी करून दे

माय
तु मला कवीता करण्यासाठी 
हे वेडं जग दाखिवलस 
त्याचं पांग फेडल्याविवाय राहणार नाय

पण
तु रडू नकोस गं माझी माय
तुझ्याशिवाय या वेड्या जगात 
माझं कोण हाय.
          🌹🌹🌹
            *वेडा कवी*
        *सत्यवान कांबळे*
   तारीख:-06/01/2017 
मो.नं:-8600243781 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खलील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2017/01/blog-post_5.html

चारोळी:30

बगता बगता
तु मला सोडून गेलीस

जाता जाता माझ्या
ह्रदयाला चोरून नेलीस

     वेडा कवी
सत्यवान कांबळे

Wednesday 4 January 2017

कविते.....

*कविते*
➖➖➖➖➖➖➖➖➖
कविते,
माझ्या हाताला
अशीच लेखणी देत चल
माझ्या लेखणीला
उंदड आयुष्य लाभो

माझ्या लेखणीला
आभाळाच्या पलिकडे घेऊन चल
तुला सात जन्माचं लोटागंन घालीन

कविते,
तुझ्या माय बापावरच्या कवीता
कवि संम्मेलनामध्ये गाजवीन
पाषाण हृदयी माणसांना
माणुसकीचे धडे शिकवीन

कविते,
तुझ्या गावाकडच्या मातीत
रमलेले विचार
माझा प्राण असे पर्यंत
लोकापर्यंत पोचवण्याचं काम करीन

कविते,
माझ्या लेखणीला अशीच साथ दे
समाजामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांना
माझ्या लेखणीने
त्यांना वटणीवर आणीन

कविते,
मी कवीता करत-करत
सगळी रान-माळं धुंडीन
रानमाळातील पांखराना
तुझ्या कवीता ऐकवीन
त्यांच्याशी गोड गप्पा मारीन

पण,
माझ्या लेखणीला अशीच साथ दे
माझ्या लेखणीला अशीच साथ दे.

             *वेडा कवी*
         *सत्यवान कांबळे*
   तारीख:-05/01/2017
मो.नं:-8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुडे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2017/01/blog-post.html

Sunday 1 January 2017

चारोळी:29

कवीते माझ्या हाताला
अशीच लेखणी देत चल

माझ्या लेखणीला उंदड
आयुष्य लाभो

तुला माझ्या कडून
नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा.
              
      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

चारोळी:28

एक लाट येते
वेडेपणाची साथ घेऊन

अन गुमान निघुन जाते
मला वेडा बनवून.

      वेडा कवी
   सत्यवान कांबळे