Saturday 15 May 2021

चारोळी:214

तात्या तुम्ही दिलेले पैसे
किती वेळा *मोजू*
आज आमच्यातून निघून गेलास 
आता तुम्हाला कुठं *शोधू*
 😭😭😭😭😭😭
      वेडा कवी  
 सत्यवान कांबळे

तात्या

*माझा तात्या*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
एखादा मरत असेल तर 
त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा,
मदत करा,
धीर द्या 

कारण,
जीव जाताना कसा जातो ते 
काल मी भरल्या डोळ्यांनी बगितलय 
माझा तात्या(आजोबा) जिवाच्या अकांताने तडफडत होता आणी अखेर माझा तात्या 
वयाची *107* वर्षे पुर्ण करून 
देवाघरी निघून गेला.

माझा तात्या देवमाणूस होता 
देवच होता असं म्हणायला काय हरकत नाही.
भरल्या आयुष्यात त्यानं कुणाला त्रास दिला नाही 
जर त्रासच दिला असता तर  
नियतीच्या नियमानुसार,
तो लवकरच देवाघरी निघून गेला असता 
आणी तो *107* वर्षे जगलाच नसता.

पूर्वीची लोक म्हणायचे,
कोर्टाची आणी दवाखान्याची पायरी कधीच चढू नये.
आणी माझ्या तात्यांनी या दोन्हीची पायरी कधीच चढली नाही.
उभ्या आयुष्यात माझ्या तात्याला 
कधी कुठला आजार नाही,
कुठली गोळी नाही,
कुणाला त्रास दिला नाही 
😭😭
काल अखेर,
नियतनं आमचा घास हिरावून नेला
आणी आम्ही स्तब्ध झालो
आणी अखेरचा आम्ही 
माझ्या तात्याला निरोप दिला 
आणी माझा तात्या देवाघरी निघून गेला.

देवाला माझं एकच सांगणं आहे 
माझ्या तात्याला तु तुझ्याकडे
 बोलावून घेतला आहेस 
तसच तुझ्याजवळ सुखी ठेव 
जर गद्दारी केलीस तर गाठ माझ्याशी आहे.

साखर खाऊन मुगीसारखं सारखं रहा.
जातांना कोण काहीच घेऊन जाऊ शकत नाही.
*एकमेकास साह्य करू अवघे धरू सुपंथ*
या प्रकारे रहा खरच जीवण खुप सुंदर आहे .

तात्या तुझ्या या 107 वर्षाबद्दल किती बोलावं 
तेवढं कमीच आहे.
 miss you तात्या😭😭

Wednesday 23 October 2019

चारोळी:213

जिच्यासाठी रात्रभर जागायचो 
ति मात्र कायमची सोडून गेली 
तिला माझी कदर नव्हती
म्हणून दगा देऊन गेली.

     वेडा कवी 
 सत्यवान कांबळे

Friday 20 September 2019

चारोळी212

तु कशी पण रहा                                      
पण दिसतेस खुप छान                         
तुला बगता छणी                                           
माझे हरपुन जाते भान.

    वेडा कवी 
सत्यवान कांबळे

Tuesday 11 June 2019

चारोळी:211

तुझ्या आठवणीत मी
आता थकलो आहे.
सुंदर अशा चेहर्याला
कधीच मुकलो आहे.

    वेडा कवी
सत्यवान कांबळे

चारोळी:210

आभाळ भरून आल्यावर
तुझीच आठवण येते
तुझ्या भेटीचा तो छन
खुप काही सांगून जाते.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Friday 7 June 2019

तिच्या गावावरून जातांना

तिच्या गावावरून जातांना,
वाटायचं मध्येच बस थांबवावी
आणी जावं तिच्या घरी
आणि बोलावं मनमोकळेपणाने
वाटलच तर चार थेंब अश्रूही गाळावं
तिच्या मांडीवरती...

तिच्या गावावरून जातांना,
मधेच एक नदी लागायची
बसमधून उतरावं
आणी तिला नदीकाठी बोलवून
खुप गप्पा माराव्या...