Thursday 27 December 2018

चारोळी:200

तुझ्या आठवणीत
मी रोज झोपतो उपाशी,
माझा विचार न करता
तु जेवत जा तुपाशी.

    वेडा कवी
सत्यवान कांबळे

Friday 30 November 2018

माय बाप

बा
काळवंडलेलं तोंड वर खुपसत
चातकावानी 
पावसाची वाट बगायचा...

पाऊस कधी पडेल,
पेरणी कधी होईल
जनावरांना ओला चारा कधी मिळेल
याचाच सारखा विचार करायचा...

पाऊस पडल्यावर
शेतात दाणं पेरायचा
पिक डौलदार आल्यावर
पिकाकडं बगत-बगत
उभ्या आयुष्याची स्वप्नं रंगवायचा...

त्या भरल्या पिकात
कुणाला ज्वारी दिसते,
कुणाला बाजरी दिसते,
कुणाला मटकी
अन हुलगं दिसते...

मित्रहो,
मला माहित नाही
अजून कुणाला काय दिसते
पण मला
त्या भरल्या पिकात
अन तडपत्या उन्हात
काम करताना
माझी माय मला दिसते.....

त्याच भरल्या पिकात
उभ्या आयुष्याची स्वप्नं बघत
लेकरा बाळांच कल्याण होईल
म्हणून बाप गुरावानी राबायचा.....

पण
येण वेळी
पावसानं दगा
भरलेल पिक वाया गेलं.....

बाप
समाजात चिंतेत वावरू लागला
सावकार पैकं मागायला
घरी येईल या भिती पोटी
उपाशी राहू लागला.....

सावकार
पैकं मागायला घरी आला
चार दिस जाऊदी
असं सांगून बापानं
सावकरला माघारी पिटावलं

पण
बापानं आमासनी
पैशाची जुळवा जुळव करतू म्हणून
घरातून बाहेर पडला
पण बाप चार दिस घरी आला नाय
आम्ही शोधा-शोध चालू केली.....

तो पतूर गावातल्या
पाटलानी खबर दिली
अरं ये पोरा;
तुझ्या बापानं आमच्या वावरात
येरडाचं औषीद पिऊन जीवनयात्रा संपवली.....

माय अन मी
धावत पळत जाऊ पतूर
बापानं जीव सोडला हुता.....

बापाच्या हातात एक चिठ्ठी हुती
माझ्या छकुलीला
चांगला नवरा बगून
लगीन करून दया
ती मागेल ती हट्ट
सावकास का होईना पुरवा.....

उभ्या आयुष्यात
एवढं कधी वंगाळ वाटलं नव्हतं
ज्या दिसी बाप आमासनी सोडून गेला
त्यादिशी एवढं वंगाळ वाटलं
बापानं रंगवलेली स्वप्नं
ही स्वप्नेच राहिली.

     वेडा कवी
  सत्यवान कांबळे
मो.नं:8600243781
मो.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि सोलापूर
ही कविता खालील लिंक वर रजिस्टर केली आहे
कविता आवडल्यास कविच्या नावासहित पुढे पाठवा.

Tuesday 20 November 2018

चारोळी:199

वाटलं नव्हतं मला
तु सोडून जाशील म्हणून
पण एक विचार सांगून गेला
तु परत येशील म्हणून.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

चारोळी:198

तुझी वाट बघून बघून
डोळे थकले आता,
एकदा तरी येऊन जा
हीच प्रार्थना करतो आता.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे
     

चारोळी:197

जाताना सांगून गेली
आता कधीच नाही येणार,
तुझी माझी भेट आता
कोणत्या जन्मी होणार.
       
     वेडा कवी
सत्यवान कांबळे

Sunday 11 November 2018

चारोळी:196

ती त्यालाही बोलते
अन मलाही बोलते
मग ती नेमके
कुणावर प्रेम करते.

   वेडा कवी
सत्यवान कांबळे

Saturday 10 November 2018

चारोळी:195

तु काही दिवसांनी
मला सोडून जाणार
तुझ्या आठवणी मात्र
माझ्या हृदयी कायम राहणार.
    
     वेडा कवी
सत्यवान कांबळे

Friday 9 November 2018

चारोळी:194

माहीत नाही मला
येताना ती कशी आली
जाताना मात्र
ह्रदयात घर करून गेली.

     वेडा कवी
सत्यवान कांबळे

Tuesday 30 October 2018

चारोळी:193

तुला किती वेळा सांगू
माझ्याजवळ बसू नकोस,
मग हळूच डिवचल्यावर
गालातल्या गालात हसू नकोस.

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

Wednesday 24 October 2018

चारोळी:192

ती जपते
तिच्या मुखाला
अन मी जपतो
माझ्या नखाला.

   वेडा कवी
सत्यवान कांबळे

Tuesday 23 October 2018

चारोळी:191

बग ना सखे,
तुला बगून चंद्र हासला
तुझ्या आठवणीत मग
माझा कंठ दाठला.

    वेडा कवी
सत्यवान कांबळे

चारोळी:190

बोल ना सये,
असं किती दिवस रूसणार
माझं प्रेम मात्र शेवटपर्यंत
तुझ्यावरच असणार.

     वेडा कवी
सत्यवान कांबळे

Sunday 21 October 2018

चारोळी:189

तुझी आठवण आल्यावर
तुझाच फोटो पाहणार,
मग त्या फोटोतला चेहरा
या वेड्याला वेड लावणार.

        वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Tuesday 16 October 2018

चारोळी:188

तुझी माझी भेट व्हावी
असं मला खुप वाटायचं,
भेटीला तू नकार दिल्यावर
मनात काहूर दाटायचं.

     वेडा कवी
सत्यवान कांबळे

Monday 15 October 2018

चारोळी187

तू सोडून जाताना
ह्रदय माझं रडत होतं,
दिलेल्या वेदना सहन करत
एका कोपर्यात सडत होतं.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Sunday 14 October 2018

चारोळी:186

तूझी आठवण आल्यावर,
डोळे माझे भरून येतात
नकळत विचाराचं काहूर
नदीकाठी फिरून येतात.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Thursday 11 October 2018

चारोळी:185

तुझी माझी मैत्री
जगाची पल्याड होती
तु म्हणायची मला
डोंगराच्या आल्याड होती.

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

चारोळी:184

तू चुकत नाहीस
प्रत्येक वेळी मी चुकतो
तुझी आठवण आल्यावर
तुझ्या प्रेमा पुढे मीच झुकतो.

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

चारोळी:183

असं नकोस बोलू सये,
मी तुझ्यावरच प्रेम करतो
तु निघून गेल्यावर
तुझ्याच चितेवर मरतो.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Monday 8 October 2018

चारोळी:182

मला माहीत नाही
ती सध्या काय करते?
पण जिथे आहे तिथे
माझ्याच नावाने झुरते.

     वेडा कवी
सत्यवान कांबळे

Saturday 6 October 2018

चारोळी:181

मी तिला म्हणत होतो,
नको आपण प्रेम करायला
तु सोडून गेल्यावर
एकांतात झुरायला.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

चारोळी:180

एवढा पण जीव लावू नको
तु सोडून गेल्यावर त्रास होईल
जसं पाखरं उडून गेल्यावर
घरटं पण उदास होईल.

      वेडा कवी
   सत्यवान कांबळे

Friday 5 October 2018

चारोळी:179

तु सध्या काय करते
मला माहीत नाही,
पण माझं मन मात्र
तुझ्याच आठवणीत झुरते.

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

चारोळी:178

तु सोडून गेलीस म्हणून
तुझ्याच आठवणीत जगतो,
आठवण तुझी आल्यावर
मनातल्या मनात रडतो.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Thursday 4 October 2018

चारोळी:177

ती भेटायला आली की,
खायाला आणायची गोड
ती बागेत रुसून बसायची
अन माझा हुयाचा हाफ मोड.

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

चारोळी:176

मी नाही सोडून गेलो गं
तुच मला सोडून गेलीस
दुःख माझ्या नशिबी देऊन
प्रेमाला मोडून गेलीस.

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

चारोळी:175

मी आता ठरवलय
कधीच हट्ट धरणार नाही
तु जरी सोडून गेलीस
तु आल्याशिवाय मरणार नाही.

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

चारोळी:174

वेडापिसा जीव झाला तरी,
तुझ्यावरतीच प्रेम करणार
तु कर ना कर पण
हातावर तुझ्याच नावची मेहंदी काढणार.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Monday 1 October 2018

चारोळी:173

तिच्या सहवासात राहून
मी रमून गेलो
सहवास तिचा जास्तच वाढला
अन त्यात मी दमून गेलो.

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

चारोळी:172

तुझ्या डोळ्यातील निखारे
खुप काही सांगून गेले
विसरून मात्र जाऊ नकोस
असं म्हणत भांडून गेले.

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

Sunday 30 September 2018

चारोळी:171

तिला भेटण्यासाठी
हा रोज तरसायचा
अन ऐन भेटीवेळी
हा पाऊस मध्येच बरसायचा.

     वेडा कवी
  सत्यवान कांबळे

चारोळी:170

गुलाबाला पण खबर लागलीय,
तू मला सोडून गेल्याची 
एकांतात बसून प्रार्थना करतोय
तू परत येण्याची.
        
          वेडा कवी 
      सत्यवान कांबळे

Friday 28 September 2018

चारोळी:169

तुम्ही दोघे सुखी रहा
मी राहीण तुमच्यापासून लांब
सदैव उभा राहीण तुमच्यासाठी
म्हणून एक पाण्यातलं खांब

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

Tuesday 25 September 2018

चारोळी:159

ह्रदयावर घाव करून
ती सोडून गेली
विसरणार नाही कधीच
हा शब्द मोडून गेली.

    वेडा कवी
सत्यवान कांबळे

Sunday 23 September 2018

चारोळी:168

झाल्या असतील चुका माझ्याकडून
तर मला माफ कर
तुझ्या मनात काय असेल तर
ह्रदय तुझं साफ कर.

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे

Saturday 22 September 2018

चारोळी:167

निरोप घेतो सये,
तुझी परवानगी घेऊन
निघून जाईन दुर
काळीच तुझ्या हातात देऊन.

     वेडा कवी
सत्यवान कांबळे

शिक्षणासाठी गाव सोडून रहाताना

शिक्षणासाठी गाव सोडून राहताना.....
➖➖➖➖➖➖➖➖➖
(ही कवीता माझ्या काळजातली आहे.हे दिवस मी अनुभवलेले आहेत म्हणून माझ्या कंठातून हे शब्द बाहेर पडले.)

शिक्षणासाठी गाव सोडून राहताना
भरपूर काही सहन करावं लागतं
सहन करता-करता 
घरच्यांना व जुन्या मित्र-मैत्रिणींना
आठवावं लागतं...

स्वतःची अभ्यासाची
स्पेशल खोली पण अपूरी वाटते 
मात्र;
बारा गावच्या बारा मित्रा बरोबर
रूम करून रहावं लागतं...

घरचं चूलीवरचं गरम पाणी गार वाटतं 
रूम मधल्या टाकीतलं 
गार पाणी पण गरम वाटतं
रूममधल्या टाकीतलं गार पाणी 
गरम समजून अंगावर घेऊन
आई गंऽऽऽऽऽऽ म्हणावं लागतं...

मेसमधल्या ज्वारीची भाकर बघुन
ज्वारीचं कोठार असलेल्या
मंगळवेढा संताच्या भूमीची
मला आठवण येते...

मेस मधलं जेवण बघुन
घरातल्या शिक्यावरच्या टोपलीची 
आठवण येते 
भुकेच्या आगीनं मेसचं 
जेवण पण मला जेवावं लागतं...

रात्री झोपेत दच्चऽऽकण जाग आल्यावर
त्या गोठ्यातल्या जनावरांची,
म्याव म्याव करणाऱ्या मनीची
आणि मोतीराम नावाच्या
कुत्र्याची मला आठवण येते...

मी घरी आजारी पडल्यावर 
माझ्या वेड्या मायला सांगायचो 
पण आता इथे रूमवर 
माझी वेडी माय नाय
आता कुणाला सांगु?
हा प्रश्न मला सारखा पडतो...

वेड्या मायची आठवण आल्यावर 
माझ्या डोळ्यात सारखचं पाणी येतं
ते पाणी मला सारखच 
शर्टानं पुसावं लागतं...

मात्र;
शिक्षणासाठी गाव सोडून राहताना
भरपूर काही सहन करावं लागतं
सहन करता-करता 
घरच्यांना व जुन्या मित्र-मैत्रिणींना
आठवावं लागतं.
           
            वेडा कवी
        सत्यवान कांबळे
    मो.नं:-8600243781 
  तारीख:-28/02/2015 
मु.पो.रड्डे ता. मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/09/blog-post_30.html
➖➖➖➖➖➖➖➖➖

Friday 21 September 2018

चारोळी:166

तिची जवळीकता,
माझ्या मनाला बांधून गेली
प्रेमात विरह काय असतो
जाताना मात्र सांगून गेली.

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

Thursday 20 September 2018

चारोळी:-165

तुझ्या ओठावर
माझंच नाव असावं
माझ्या आयुष्यात
तुझ्याशिवाय कोणीच नसावं.

      वेडा कवी
   सत्यवान कांबळे

चारोळी:164

तिची जवळीकता
मनाला भावून गेली
प्रेमात विरह काय असतो
जाताना मात्र दाऊन गेली.

         वेडा कवी
     सत्यवान कांबळे

चारोळी:163

आठवण तुझी आल्यावर,
बागेत फिरून येतो
तु नाही दिसली की
नव्याने झुरून येतो.

     वेडा कवी
सत्यवान कांबळे

Monday 17 September 2018

चारोळी:162

नकळत तिच्याकडे वळलो
भावनेच्या भरात
ती चुक सतत सलते
ह्रदयाच्या घरात.

    वेडा कवी
सत्यवानकांबळे

Saturday 15 September 2018

चारोळी:161

ठरवलं आता मी
तुझ्या आठवणीना आवरायचं
आठवण जरी आली
पाणावलेल्या डोळ्यांनी सावरायचं.

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

Monday 10 September 2018

चारोळी:160

तिच्या जवळ गेल्यावर
मला आवडत नाही म्हणायची
काॅलेजमधे गेल्यावर मात्र
टक लावून माझ्याकडेच बघायची.

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे

चारोळी:158

ती प्रतेकवेळी म्हणायची
तुझ्या शब्दाला आहे धार
मी काहीच करू शकत नाही
माझे शब्द करतात तिच्यावर वार.

         वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Friday 7 September 2018

चारोळी:157

कडाक्याच्या भांडणात
ती गेली रुसून
तिच्या आठवणीत आजही रडतोय 
गुलाबी बागेत एकातांत बसून.
     
          वेडा कवी 
      सत्यवान कांबळे

Thursday 6 September 2018

चारोळी:156

तुझ्या-तुझ्या गुंगीत 
कुठे गेलीस रुसून
तुझी वाट पाहतय
फुलपाखरू बागेत बसून.
     
     वेडा कवी 
सत्यवान कांबळे

Sunday 2 September 2018

चारोळी:155

किती मनापासून जपली होती
आपली ही गोड नाती
तुझा रुसवा-फुगवा काढण्यातच
माझ्या आयुष्याची झाली माती.

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे

Tuesday 28 August 2018

आयुष्याच्या वळणावर

जीवन खूप सुंदर आहे 
ते आंनदाने जग
प्रेमाने जग
हळव्या मनाने जग...

जगता-जगता
कोणाच्या हृदयात 
आयुष्याचं घर करून 
राहता येतयं का बग...

जीवन म्हणजे,
लहान बाळाची खेळणी,
नवरा बायकोचा संसार
आयुष्याचा सुंदर रथ...

तुझं लाख मोलाचं प्रेम 
कोणाला देता येतय का बग 
घेता येतय का बग 
प्रेमाने जग जिंकता येतय का बग...

आपलं प्रेम बहरत असतानाच 
मी दु:खी अंतकरणाने 
शेवटी तुझा निरोप घेतला...

त्या वेळेस तु मला बघुन
दिवसभर रडली होतीस  
रडता-रडता 
मला दुःखी अंतकरणाने
बोलुन गेली होतीस...

आयुष्याला सांभाळ
विचारांना सांभाळ 
तुझ्या या हळव्या मनाला 
कधीच त्रास करून घेऊ नकोस
आपल्या काॅलेजच्या ग्रुप मधला फोटो 
तुझ्या घरामध्ये लावून घे
कारण घरातून बाहेर येता जाता 
मी तुला नक्कीच त्या फोटोमध्ये दिसेन...

या जन्मी मी तुझी 
नाही होऊ शकले
पुढच्या जन्मी  
नक्कीच मी तूझी होईन
असं म्हणून तू 
माझा निरोप घेतलास...

ज्या ठिकाणी तू मला
पहिल्यांदा भेटलीस
त्याच जुन्या वळणावरती 
आज मी हातामध्ये गुलाबाचं 
फुल घेऊन उभा आहे...

कारण,
तू मला 
कोणत्या ना कोणत्या 
रूपाने भेटशील 
याच आशेने मी उभा आहे...

पण त्या ठिकाणी
तु मला कधीच दिसत नाहीस
त्या प्रेमाच्या जुन्या वळणावरती 
मला एक वेगळच 
रोज नवीन जोडपं दिसतं...

त्यावेळेस माझ्या तोंडातून 
शब्द फुटेनासे होतात
मग मी तुझा 
विचार करत घरी येत असताना
वाटेमध्ये मला एक 
वेगळाच प्रश्न पडतो...

ती कुठे गेली?
मी कुठे गेलो?
माझं हळवं मन कुठे गेलं?
तिच्या आयुष्याला वेड लावणारे 
माझे विचार कुठे गेले?

हा सगळा विचार 
करत असताना
घर कधी येतय 
हे माझं मलाच कळत नाही...

शेवटी मी तुला एवढेच म्हणेन
आयुष्याच्या नव्या वळणावर
तु जात असताना
जुन्या वळणावरच्या 
गावाकडल्या मातीतल्या 
तुझ्या त्या हळव्या मनाच्या मित्राला 
कधी सुध्दा विसरू नकोस...

दिल्या घरी तू सूखी रहा
दिल्या घरी तू सूखी रहा.
           
          वेडा कवी
      सत्यवान कांबळे
   मो.नं:-8600243781 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कविता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवून वरील फोन नंबर फोन करून बोलूही शकता.

Saturday 25 August 2018

दुष्काळाचं आभाळ


*दुष्काळाचं आभाळ*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*(आज रक्षबंधनाचा सन भाऊ बहिणीचं नातं असच वाढत जाओ म्हणून ती बहीण त्या आपल्या भावाला राखी बांधत असते.आणी आपल्या हातून जेवढी ओवाळणी होईल तेवढी तो देत असतो.पण त्याच बहिणीची लग्न झाल्यावर कशी तारांबळ उडते ती तारांबळ मी माझ्या कवितेतून तुमच्यासमोर मांडतोय.)*

बा च्या मनात 
दुस्काळाचं आभाळ
दाटून आलं व्हतं...

सगळीकडं दुस्काळाचं
थैमान माजलं 
अन् त्यात पोरीचं लगीन आलं

बा पोरीच्या लग्नासाठी 
पैशाची जूळवा-जुळव करत 
सैरा-वैरा धावत हुता...

लग्नासाठी बा नं
गोठ्यातली जनावरं विकली 
पैशाची जुळवा-जुळव झाली 
पोरीचं लगीन ठरलं 
लगीन झालं 
पोरगी सासरी नांदायला गेली
पण पोरीचा दादला(नवरा) दारूडा निघाला...

पोरीचा अधून-मधून 
बा ला फोन यायचा 
सगळी हकीकत पोरगी
बा ला फोनमध्ये सांगायची
बा कूणाला न सांगता 
हातरूणात हुंदक्या देऊन रडायचा...

दादला पोरीला
रातभर दारू पिऊन मारायचा 
पोरगी सकाळी उठून 
वायरची पिशवी हातात घेऊन
पांदि-पांदीनं माहेरला निघायची...

आलेली रात कशी तरी ढकलायची 
सकाळी उठून मायच्या हातची 
असेल ती चटणी भाकर खाऊन
शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या गाठी भेटी घ्यायची..
आणी बा च्या गळ्यात पडून 
मोठ मोठयाने रडायची...

बा गळयात पडूनच पोरीला म्हणायचा,
*दिली तवाच मेलीस*
स्वतःच्या नशिबाला दोष देत
पोरगी पुन्हा सासरचा रस्ता धरायची...

त्या वेळेस
बा च्या डोळ्यात
दुस्काळाचं आभाळ
गच्च भरून यायचं.
             
            वेडा कवी
         सत्यवान कांबळे
     तारीख:23/01/2017 
      मो.नं:-8600243781 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुडे पाठवून वरील फोन नंबरवर फोन करून बोलूही शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2018/08/blog-post_25.html

Tuesday 21 August 2018

चारोळी:154

तिनं त्याच्याशी बोलत
माझ्या मनाला फसवलं
मिळून अभ्यास करू म्हणत
माझ्या अभ्यासाला कोपर्यात बसवलं

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे

चारोळी:153

तु सोडून गेल्यावर
रात्रभर रडलो होतो
आसवाच्या एकेका थेंबात
मी आकंठ बुडलो होतो

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Saturday 18 August 2018

बाप

*बाप*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*(माय भुमीवरच्या बापाची वेदना मांडणारी कवीता मी आज तुमच्यासमोर सादर करतोय.या कवीतेतील मी,माझी प्रियशी,शेजारचा गणू काका आणी माझा बाप ही पात्रं खरी नसून काल्पनिक आहेत पण समाजामध्ये असं घडतं हे मात्र नक्की.)*

माय आणी आबा 
दिस मावळताना 
काम करून 
घरी परतत हुती

पाखरांचा चिवचिवाट 
ढगांचा गडगडाट सुरू झाला
विजाही चमकू लागल्या 
अन् त्यात पावसालाही सुरवात झाली

अन् ज्या-ज्या वेळेस पाऊस पडतो
त्या -त्या वेळेस त्या रिमझिमत्या पावसात 
माझी प्रेयसी आठवत नसून 
माझा बापच मला आठवतो

कारण,
त्या शेजारच्या गणू काकानं 
गेल्या वर्षी पाऊसा अभावी 
आलेलं पिक वाया गेलं म्हणून
आत्महत्या केली हुती

तवापासनं 
म्या बी धस्का खाल्लाय 
बा शेताला गेल्यावर 
म्या बी मागं मागं जातू
अन् बा ची नजर चुकवत 
दावणीतला कासरा झाकून ठिवतू

शेतातलं काम उरकून
घरी येताना 
म्या बी बा च्या मागं मागं इतू

अन् रात्री बा झोपुस्तर
म्या बी झोपत नाय
झोप लागेल या भितीपोटी 
संध्याकाळी म्या बी जेवत नाय

मित्रानो,
खरं खरं सांगू 
आता हल्ली पाऊसही पडत नाय 
पाऊस जरी नाही पडला
पावसा अभावी पीक वाया गेलं म्हणून
मरगळलेल्या बापाला
मी आता आठवूही देत नाय.
         
         *वेडा कवी*   
      सत्यवान कांबळे 
   मो.नं:8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा.जि.सोलापूर 
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.
आवडली तर कवीच्या नावासहित पुढे पाठवून वरील नंबरवर काॅलही करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2018/08/blog-post_18.html

कथा:गावाकडची आठवण

            गावाकडची आठवण

आज स्वप्नात तिच्या गावी जाऊन आलो.
गावभर फिरलो पण ती मला कुठेच दिसली नाही.
एक बिचारा पोरगा माझ्याकडे माझ्या वेदना जाणून घेण्यासाठी धावत-धावत पळत आला आणी तिचं लग्न झालय आणी ती सासरी नांदायला निघून गेली आहे असं पटकन सांगून निघून गेला.
मी पाणाविलेल्या डोळ्यांनी घरी परतलो अन् पटकण जाग आली.

       

Friday 17 August 2018

चारोळी:152

पाऊस पण बग ना
किती दिवसातून पडला
तिची आठवण आली म्हणून
तो ढसा-ढसा रडला.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे
 

Thursday 26 July 2018

pandharpur

*पंढरपूरची आठवण*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
दोन वर्ष एम.ए(इंग्रजी) साठी
पंढरपूरला शिकायला होतो
पण पंढरपूरच्या पांडुरंगाचं
तोंड कधीच बघितलं नाही.
पण आज त्या पांडूरंगाची ओढ लागली आहे.
कारण जवळ असणार्या माणसाची किंमत माणसाला कधीच नाही कळत.
त्या माणसाची किंमत दुर गेल्यावर समजते.त्यामुळे एखाद्या माणसाला लांब करण्याअगोदर 100 वेळा विचार करा.
पण त्या विठूरायाचा आशिर्वाद माझ्या पाठीशी होताच म्हणून मी एम.ए मध्ये नाव कमावलं.
पण त्या पांडूरंगानं मला एम.ए ची एवढी मोठी पदवी दिली अन् एम.ए ला *First Class* झालो.
त्या पंढरपूरला, त्या विठूरायाला कधीच विसरू नाही शकत.

               *वेडा कवी*
          *सत्यवान कांबळे*

Saturday 21 July 2018

चारोळी:151

तिची आठवण आली की
काळीज फाटून जातं
नकळत विचाराचं काहूर
माझ्या मनात दाटून येतं.
         
        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

Friday 20 July 2018

चारोळी:150

खूप छान काम केलस 
तू मला ब्लाॅक करून
निवांत झालो बघ आता 
ठेवील मनाला नीट धरून.
     
        वेडा कवी 
    सत्यवान कांबळे

Wednesday 18 July 2018

चारोळी:5

सखे माझा जीव 
खरच तुझ्यावर जडलाय
माझ्या मनातला खोल कप्पा
तुझ्या आठवणीत रडलाय.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे
           
       
       

Sunday 15 July 2018

चारोळी:149

तुला किती वेळा सांगू
माझी झाली चूक
तुझा विचार करत
माझे शब्द झाले मुक.

    वेडा कवी
सत्यवान कांबळे

Friday 29 June 2018

चारोळी:148

विचार माझा करू नकोस
निवांत झोपत जा
झोपेच्या गोळ्या किती खाल्या
हेही मोफत जा.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Tuesday 26 June 2018

चारोळी:147

वटपोर्णिमेच्या सणाला
माझ्याबदद्ल काही मागू नकोस
मागितलस जर काही
माझ्यावाचुनी राहू नकोस.

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

चारोळी:146

बा दिसभर राबायचा शेतात
अन् संध्यांकाळी झोपायचा उपाशी
आम्ही त्याच्या जिवावर
आजकाल खातो तुपाशी.

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

चारोळी:145

माझी जिवलग होती
सुंदर अशी परी
मी तिच्या प्रेमात पडताच
दोघात पडली कायमची दरी.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

चारोळी:144

माझ्या सभोवताली राहायची
एक खेड्यातली बाय
तिनं माझा सांभाळ केला
अन् ती झाली माझी माय.

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

Thursday 21 June 2018

चारोळी:143

*चारोळी (स्पर्धेसाठी)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सोन्यावाणी शेत माझं
दुस्काळाणी झालीय *दैना*
त्याच शेतामधी दिसभर
काम करायची माझी *मैना.*

         *वेडा कवी*
     *सत्यवान कांबळे*

चारोळी:142

सोन्यावाणी शेत माझं
दुस्काळाणी झालीय दैना
त्याच शेतामधी दररोज
भेटायची माझी मैना.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

Wednesday 20 June 2018

माझी माहिती

👏👏👏👏👏👏👏👏👏👏
*माझे नाव :-*
सत्यवान मच्छिद्रं कांबळे

*टोपन नाव:-*
वेडा कवी

*मोबाईल नंबर:*
8600243781
9527362720

*पत्ता:-*
मु.पो.रड्डे.ता.मंगळवेढा.जि.सोलापूर

*शिक्षण:-*
(1)H.S.C D.Ed,
(2)M.A B.Ed(English).

(3)D.S.M (Diploma in School Management)

*पुरस्कार:-*
सलग दोन वेळा गुणवंत वाचक पुरस्कार प्राप्त.
पहिला पुरस्कार कवी फ.मु शिंदे यांच्या हस्ते.
दुसरा पुरस्कार ग्रामीण कथाकार अप्पासाहेब खोत यांच्या हस्ते.
कवी संजीविणी तडेगावकर यांच्या हस्ते विविध पारितोषकाने सन्मानित.

*वक्तत्वस्पर्धा:-*
तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय पर्यत मजल तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित.

*छंद:-*
कथा,कांदबरी,नाटक यांचे वाचन
गावाकडच्या मातीतल्या कवीता लिहणे,
प्रेम विरहीत चारोळ्या लिहणे,
विविध विषयावर भाषण करणे.

*राजकीय पक्ष:-*
शिवसेना(बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक).

माझ्या कवीता अनेक news Paper मध्ये प्रशिद्ध.

माझ्या कवीता आणी चारोळया खालील blog वर रजीस्टर आहेत.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Satyawankamble.blogspot.com 

काहीच दिवसात माझे दोन पुस्तक publish होण्याच्या मार्गावर
(1)चारोळी सग्रंह.
(2)कवीता संग्रह.

चारोळी:141

ती आजारी होती
डॅाक्टरांनी सुई टोचली
किंकाळी तिने मारली
अन् वेदना मात्र मला पोहचली.

         वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Monday 18 June 2018

चारोळी:140

प्रेमच करायचं आहे ना तुला
मग आधी नीट वाग
पुन्हा मग माझ्याकडे
काहीतरी चांगलं माग.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

चारोळी:139

तो चांगल्या विचाराचा आहे
त्याला सोडू नको
मग एकदाच निघून गेला की
पुन्हा रडू नको.

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

Saturday 16 June 2018

चारोळी:138

तुझ्या आठवणीचं काहूर
माझ्या मनात वाजतय
प्रेमाचा वनवा पेटला की
आपोआप भाजतय.

     वेडा कवी
सत्यवान कांबळे

चारोळी:137

तुझ्या नावाचं गोदंन
मी हातावर गिरवलय
तुझ्यावर खरं प्रेम करतो
म्हणून चार-चौघात मिरवलय.

          वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Thursday 14 June 2018

चारोळी:136

तिच्या एका इशार्याने
हा घायाळ झाला
तिने केसात हात कुरवळला
अन् पुन्हा मायाळ झाला.

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

चारोळी:135

तु पण बगून हसली
मी पण बगून हसलो
कळलं नाही तेव्हा
मी तुझ्या हसण्यात फसलो.

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

चारोळी:134

तुझी आठवण आल्यावर
डोळे भरून येतात
नकळत पापण्या ओल्या होऊन
ह्रदयाच्या कोपर्यात रडून जातात.

            वेडा कवी
        सत्यवान कांबळे

चारोळी:133

दुसरा पर्याय नव्हता
तुला विसरून जाण्यासाठी
अर्धवट कॅालेज सोडून जाणं
हा एकमेव मार्ग होता माझ्यासाठी.

            वेडा कवी
        सत्यवान कांबळे

Wednesday 13 June 2018

चारोळी:132


पाखरं उडून गेल्यावर 
घरटं पण उदास वाटतं
जसं आवडीची माणसं निघून गेल्यावर
आयुष्य अगदी भकास वाटतं.

         वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Tuesday 12 June 2018

चारोळी:131

मलाही माहीत आहे गं
आता असच होनार
आपल्या मैत्रीतला दुरावा
कायमचाच वाढत जानार.

          वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Thursday 7 June 2018

चारोळी:130

मन खुप कठोर केलय गं
तुला Block करण्यासाठी
माफ कर गं सये,
काहीच करू शकलो नाही तुझ्यासाठी.

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे

Tuesday 5 June 2018

चारोळी:129

खुप दुर जावावं म्हणतोय
नभाच्या पल्याड
तिथे सोबतीला आहे ना
चटक चांदणी ढगाच्या आल्याड.

             वेडा कवी
        सत्यवान कांबळे

चारोळी:128

तुझ्या नावाचं गोदंन
हातावर लिहून टाकलय
तु माझीच हो असं
देवाला साकडं घातलय.

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे