Sunday 25 March 2018

चारोळी:100

स्वप्नात येईन पण
फारसं जवळ घेऊ नको
आणि जवळ घ्यायचंच असेल तर
पुन्हा अंतर देऊ नको.

         वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Saturday 24 March 2018

चारोळी:99

ज्यावेळेस ती कारटी
माझ्या प्रेमात पडली
त्या वेळेस माझी कवीता
तिच्या सौंदर्यासमोर नडली

           वेडा कवी
      सत्यवान कांबळे

चारोळी:97

आता रडू नकोस गं
घडायचे ते घडून गेले
दिल्या होत्या वेदना तूच
प्रेमाचे दार मोडून गेले
  
       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

चारोळी98

मी कवीतेत तुला पाहतांना
त्यावेळेस तु होतीस लहाण
तीच कवीता आता वाचतांना
आता वाटतेस खूप महान

          वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Thursday 22 March 2018

चारोळी:96

तुझी प्रेमाची माया
आयुष्यभर मला साथ देशील का
वावटळ प्रेमाची आली की,
तुझ्या मिठीत मला घेशील का

            वेडा कवी
       सत्यवान कांबळे

Tuesday 20 March 2018

चारोळी:95

सये,तुझ्या मुखाचे
विचार किती खोल खोल
लग्नाचे आमिश दाखवून
मला फिरवतेस गोल गोल

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

Saturday 17 March 2018

चारोळी:94

सये,मला तुझ्यासोबत 
आयुष्यभर जगायचं होतं
तुझ्या हातची भाकर खाऊन 
तुझ्या प्रेमात रमायचं होतं

Saturday 10 March 2018

चारोळी:93

तुझ्या प्रेमात झिंगाट होऊन 
मी वेडा कवी झालोय बघ
तु माझ्याकडे ये अगर नको येऊ
पण मी तुला विसरणार नाही बघ.

          वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Tuesday 6 March 2018

चारोळी:92

                 सये,
तुझ्याबरोबर खेळलेली रंगपंचमी
आजही मला आठवतेय गं
पण आठवून काय करायचं आत्ता
मनाला सारखीच सतावतेय गं.
       
             वेडा कवी
        सत्यवान कांबळे