Friday 24 March 2017

या पाखरांनो या...

*या पाखरांनो या...*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
या पाखरांनो या...
माझ्या अंगणात या 
माझ्या आज्जीकडून 
चिऊ आणी काऊची गोष्ट ऐका
दाणे खाऊन पाणी प्या 
जाताना तुमच्या घरट्यातील पिलांना 
दाणे घेऊन भुरऽऽऽकण उडून जा

पण जातानां,
माझं एक काम करा
तुमच्या घरट्या शेजारी 
एक छोटसं गाव आहे 
तिथे माझी प्रियशी राहतेय
तिला मी सुखी आहे म्हणून सांगा

तिचा निरोप घ्या
निरोप घेऊन पुन्हा माझ्याकडे या
मी तुमची चातकावानी
वाट पाहत बसलेला असेन

पाखरांनो,
तिच्या आठवणीने 
माझं मन व्याकूळ झालं आहे
तिच्या आठवणीत रडून-रडून
माझे डोळे लाल झाले आहेत

पाखरांनो,
त्यावेळेस माझी माय मला विचारते,
काय झालंय डोळ्याला?
मग माझे शब्द मुके होतात
पुन्हा मोठ्याने मला हुदंका येतो
पण तो हुंदका मायला
मी कधीच दाखवला नाही

त्यावेळेस मी मायला सांगतो
माय;
डोळ्यात खडा गेला आहे
डोळे चोळून-चोळून
लाल झाले आहेत

तिच्या आठवणी माझ्या ह्रदयात
आजही घर करून आहेत
त्या आठवणी मला
कधी-कधी
हसवतात, रडवतात,फुगवतात
जाताना मात्र,
ह्रदयाला पिळ मारून जातात

सखे,
तु कूठेही रहा
तुझ्या आठवणीत माझं मन
रमून गेलं आहे 
तुझी सारखीच मला आठवण येते
फक्त मला ऐकदाच तुला भेटायचं आहे

या पाखरांनो या...
माझ्या अंगणात या
माझ्या आज्जीकडून 
चिऊ आणी काऊची गोष्ट ऐका
दाणे खाऊन पाणी प्या
जातानां तुमच्या घरट्यातील पिलांना
दाणे घेऊन भुरऽऽऽकण उडून जा.
              🌹🌹🌹
                *वेडा कवी*
           *सत्यवान कांबळे*
       तारीख:24/03/2017
       मो.नं:8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2017/03/blog-post_24.html

Wednesday 22 March 2017

स्कार्फच्या पाठीमागे नेमकं दडलय काय?

स्कार्फच्या पाठीमागे नेमकं दडलय काय?
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ये पोरी,
स्कार्फच्या पाठीमागे नेमकं दडलंय काय?
तुझ्या सौंदर्याला 
स्कार्फने काय म्हणून बांधतेस 
त्या सौंदर्याकडं कोणीच नाही पाहिलं
तर त्या सौंदर्याचा अपमान असतो

बांधून-बांधून
तोडं किती बांधशील 
शेवटी मला बघायला 
डोळे तरी उघडे ठेवशील

पण पोरी,
त्या आधी मला एक सांग
स्कार्फच्या पाठीमागे नेमकं दडलंय काय?

तु तोडांला स्कार्फ बांधू नकोस
कारण,
तुझे टपोरे डोळे
गोबरे गाल
लाल केलेले ओठ
तांबडे कलेले केस
मला खुप आवडतात 
आणी माझ्या स्वप्नात रात्रभर बागडतात

ये पोरी,
मला तुझं सौंदर्य बघायचं नाही
तुझे डोळे बगायचे आहेत 
तुझ्या डोळ्यातील आसवांना
माझी नजरा-नजर भिडवायची आहे

माझी नजर 
तुझ्या आसवांना भिडल्यावर 
आपोआप तोंडाचा स्कार्फ काढशील 
आणी मला तुझ्या मिठीत घेशील.

पण पोरी
त्या आधी मला एक सांग
स्कार्फच्या पाठीमागे नेमकं दडलंय काय?
स्कार्फच्या  पाठीमागे नेमकं दडलय काय?

            वेडा कवी
       सत्यवान कांबळे
    तारीख :-27/01/2017 
    मो.नं:-8600243781 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पूडे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2017/03/blog-post.html

Sunday 19 March 2017

चारोळी:62

तु भेटायला येणार म्हणून
तूझी वाट पाहत बसलो
तूझी येण्याची वाट दुरावली
म्हणून मी तुझ्या विचारात फसलो

             वेडा कवी
        सत्यवान कांबळे

Wednesday 15 March 2017

चारोळी:61

आभाळ गच्च भरून यायचं
पण पाऊसच पडायचा नाही
आठवण तूझी सारखीच यायची
पण तूझा चेहराच दिसायचा नाही

           वेडा कवी
      सत्यवान कांबळे

Monday 13 March 2017

चारोळी:60


तुझ्या संगतीत राहताना
  मी खुप काही पाहीले
   इतका हरवलो तुझ्यात कि
    स्वतःकडे पाहायचेच राहिले

               वेडा कवी
          सत्यवान कांबळे

Saturday 11 March 2017

चारोळी:59

मला तुझ्यात रमायला
खुप वेळ लागला
दुखावलं माझं काळीज तू
शेवटी असं का वागला

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

Friday 10 March 2017

चारोळी:58

माझं स्वप्न आहे
तुझ्यासोबत लग्न करायचं
दिशाहीन आयुष्याला
तुझ्याअंतरी मग्न करायचं
       
        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

Tuesday 7 March 2017

चारोळी:57

सये आज मजला
कांहीतरी चुकल्या सारखं वाटलं
तु मला सोडून जाणार म्हणून
काळीज माझं  विटलं

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे

Saturday 4 March 2017

चारोळी:56

तूझ्या घरासमोरून जाताना
मला पाहून घालायचीस बुगड्या
आता तुझी पोरगी मला म्हणतेय
चला मामा आपण खेळूया फुगड्या

            वेडा कवी
       सत्यवान कांबळे

Thursday 2 March 2017

चारोळी:55

तु दिलेल्या भेटवस्तू सये
माझ्याकडून सगळ्याच परत घे
पण आठवणी परत मागत असशील तर
तुला मी काय देऊ

            वेडा कवी
        सत्यवान कांबळे

चारोळी:54

तुझे जितके प्रेम माझ्यावर ,
तितकेच प्रेम माझे ही तुझ्यावर आहे
तु माझा संसार सांभाळणार असचील तर
मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे

              वेडा कवी
          सत्यवान कांबळे