Friday 24 March 2017

या पाखरांनो या...

*या पाखरांनो या...*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
या पाखरांनो या...
माझ्या अंगणात या 
माझ्या आज्जीकडून 
चिऊ आणी काऊची गोष्ट ऐका
दाणे खाऊन पाणी प्या 
जाताना तुमच्या घरट्यातील पिलांना 
दाणे घेऊन भुरऽऽऽकण उडून जा

पण जातानां,
माझं एक काम करा
तुमच्या घरट्या शेजारी 
एक छोटसं गाव आहे 
तिथे माझी प्रियशी राहतेय
तिला मी सुखी आहे म्हणून सांगा

तिचा निरोप घ्या
निरोप घेऊन पुन्हा माझ्याकडे या
मी तुमची चातकावानी
वाट पाहत बसलेला असेन

पाखरांनो,
तिच्या आठवणीने 
माझं मन व्याकूळ झालं आहे
तिच्या आठवणीत रडून-रडून
माझे डोळे लाल झाले आहेत

पाखरांनो,
त्यावेळेस माझी माय मला विचारते,
काय झालंय डोळ्याला?
मग माझे शब्द मुके होतात
पुन्हा मोठ्याने मला हुदंका येतो
पण तो हुंदका मायला
मी कधीच दाखवला नाही

त्यावेळेस मी मायला सांगतो
माय;
डोळ्यात खडा गेला आहे
डोळे चोळून-चोळून
लाल झाले आहेत

तिच्या आठवणी माझ्या ह्रदयात
आजही घर करून आहेत
त्या आठवणी मला
कधी-कधी
हसवतात, रडवतात,फुगवतात
जाताना मात्र,
ह्रदयाला पिळ मारून जातात

सखे,
तु कूठेही रहा
तुझ्या आठवणीत माझं मन
रमून गेलं आहे 
तुझी सारखीच मला आठवण येते
फक्त मला ऐकदाच तुला भेटायचं आहे

या पाखरांनो या...
माझ्या अंगणात या
माझ्या आज्जीकडून 
चिऊ आणी काऊची गोष्ट ऐका
दाणे खाऊन पाणी प्या
जातानां तुमच्या घरट्यातील पिलांना
दाणे घेऊन भुरऽऽऽकण उडून जा.
              🌹🌹🌹
                *वेडा कवी*
           *सत्यवान कांबळे*
       तारीख:24/03/2017
       मो.नं:8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2017/03/blog-post_24.html

No comments:

Post a Comment