Sunday 29 October 2017

चारोळी:85

निवांत कट्ट्यावर बसलो की
अचानक तुझी आठवण येते
त्या आठवणीच्या हिदोंळ्यात
मन गहिवरून जाते

         वेडा कवी
     सत्यवान कांबळे

चारोळी:84

तुला शपथ आहे माझी
आठवणीत येत जाऊ नकोस
विसरलेल्या काळजाला
पुन्हा ताजेतवाने होऊ देऊ नकोस

            वेडा कवी
        सत्यवान कांबळे

Saturday 28 October 2017

चारोळी:83

तिच्या आठवणीच्या लाटा
ह्रदयाला येऊन धडकायच्या
जाता जाता मात्र
ह्रदयाला पिळ मारून जायाच्या

             वेडा कवी
         सत्यवान कांबळे

Wednesday 25 October 2017

चारोळी:82

तुझ्या काळजाच्या गाभार्यात
माझा देव लपला आहे
त्या देवाची पुजा तूच करते
अशी अफवा आहे

       वेडा कवी
   सत्यवान कांबळे

Monday 23 October 2017

वहीचं कोरं पान

मी तिच्यासाठी 
कोर्या कागदावर 
रोज कवीता लिहीत बसायचो

ती एक दिवस
मला म्हणाली ,
वहीच्या को-या पानांवर
कवितेचा डाग पडू देऊ नको
पान खराब होऊन जाईल

मी तिला म्हणालो 
अगं वेडे
वहीचं कोरं पान
फक्त तुझ्या साठीच आहे

मग 
ती मला म्हणाली,
वहीच्या कोर्र्या कागदावर
फक्त मलाच कोरतोस का?
मी होय म्हणालो

मी तिला म्हणालो,
तु वहीचा कोरा कागद आहेस
मी त्या कोर्या कागदावरील रेग आहे
तु पेन आहेस 
मी पेनमधली शाई आहे

सये,
आपलं हे आतूट नात्याचं बंधन आहे
या नात्याला,
कधीच डाग पडणार नाही 
कधीच खराब होणार नाही 
कधीच तडा जाणार नाही.

         वेडा कवी
    सत्यवान कांबळे

चारोळी:81

प्रेम प्रेम प्रेम
फक्त प्रेम होतं
तिच्यासोबतीने जगणे
एवढेच नेम होतं

    वेडा कवी
सत्यवान कांबळे

चारोळी:80

खुप दिवसानी आज
आठवण तिची आली
आणि हळूच पापणी
आसवात भिजून गेली

     वेडा कवी
सत्यवान कांबळे

Sunday 22 October 2017

चारोळी:79

तु रूसूून गेल्यावर ,
मी तुझाच विचार करत बसायचो 
तुझा रुसवा कसा काढता येईल
या विचारात झुरत बसायचो

          वेडा कवी 
     सत्यवान कांबळे

Saturday 21 October 2017

चारोळी:5

सखे माझं काळीज
तुझ्यावर गं जडलय
आठवणीत तुझ्या ते
दिवसभर रडलय
    
    वेडा कवी 
सत्यवान कांबळे

Thursday 12 October 2017

चारोळी:78

तु सोडुन गेल्यावर
मित्रानी पण माझी साथ सोडली
तुझ्या सोबत रंगवलेली
स्वप्न आसवांनी पुसली

चारोळी:77

तू सतत अशी सये,
माझ्या घराकडे येत नको जाऊ
बापाला समजले की माझ्या
फुकटचा मार नको खाऊ

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे

Wednesday 4 October 2017

चारोळी:76

माझ्या आयुष्याच्या वाटेवर,
तुझाच आरसा दिसायचा...
त्या आरश्यात पण
तुझाच चेहरा असायचा...