Wednesday 28 December 2016

पगली


*पगली*
➖➖➖➖➖➖➖➖➖
ये पगली,
तुझ्या सौंदर्याचा 
जास्त आव आणू नकोस 
तुझ्यापेक्षा या जगात 
खूप सुंदर लोकं आहेत

वक्ता काय बोलू शकतो
आणी कवी काय लिहू शकतो
हे उजेड देणार्या सूर्याला पण 
आजपर्यंत कळालेलं नाही
मग तुला काय कळणार आहे             

कारण मी पण कवी आहे
हे तुझ्या भल्या आयुष्यात    
कधी विसरू नकोस

तुझ्या सौंदर्याला  
लाख मोलाची किंमत
तुझ्याकडे असेल 
माझ्याकडे नाही

तूझं लाख मोलाचं सौंदर्य
तुझ्या घरात ठेव 
माझ्या समोर आणू नकोस
माझ्या समोर आणलीस तर
त्याची राख रांगोळी होईल.
         
          *वेडा कवी*
     *सत्यवान कांबळे*
तारीख:-28/12/2016 
मो.नं:-8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे. आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖

http://satyawankamble.blogspot.com/2016/12/blog-post_28.html

Sunday 25 December 2016

चारोळी:27

कवीला कवी आवडते
कळीला कळी आवडते

कुणाला काय आवडते
मला फक्त तू आवडते.

      वेडा कवी 
  सत्यवान कांबळे

चारोळी:26

मनात दाटले
प्रेमाचे धूके

तूझं सौंदर्य पाहून
माझे शब्द झाले मुके.

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे

चारोळी:25

माझ्या काळजाला
पिळ मारून गेलीस तू
जाताना ह्रदयाचे
तुकडे करून गेलीस तू

        वेडा कवी
   सत्यवान कांबळे

Friday 23 December 2016

चारोळी:-24

काय सांगू माझ्या
दारूड्या बा ची कहाणी
शाळेला जाताना मात्र न चुकता 
खिशातून दयायचा चाराणी

           वेडा कवी
       सत्यवान कांबळे
   मो.नं:-8600243781

Sunday 18 December 2016

दारूडा बा


*दारूडा बा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संध्याकाळी बा घरी 
दारू ढोसून यायचा 
मायला रातभर 
चाबकानं मारायचा

माय मग 
गुरागत वरडायची 
आम्ही मात्र अडगळीच्या खोलीत
दडून बसायचो

बा आमासणी मारायला आल्यावर
लेकरांना मारू नका 
काय मारायचं ते मला मारा
असं रडत-रडत माय 
लोंटागण घालायची

बा नशेत 
रातभर उभंर्यात पडायचा 
दारूचा वासं मग 
अत्तरावाणी घुमायचा

सकाळी बा मायला म्हणायचा 
कूठं-कूठू लागलं बगू 
त्यावेळेस माय 
चाबकाचे वण दाखवायची

चाबकाचे वण बगून 
बा डोळ्यात पाणी आणायचा 
मला माफ कर असं म्हणत 
हुंदक्या देऊन म्हणायचा

माय
इस्कटलेली केसं
वर सरकावत
सौभाग्याचं कुंकू लावून
नव्या उमेदीनं
कामाला लागायची.
      🌹🌹🌹
        *वेडा कवी*
   *सत्यवान कांबळे*
  तारीख:-18/12/2016
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/12/blog-post_18.html

Thursday 15 December 2016

चारोळी:23

ना आहे मोठा  बंगला
ना गाडी आहे अलीशान
नावातच माझ्या अभिमान मोठा
नाव माझे सत्यवान.

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

Wednesday 14 December 2016

चारोळी:22

सांग माझ्या सखीला
तू जाता जाता
सत्यवान तुझा कवी झाला
तुला शब्दात लिहीता लिहीता

         वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Friday 9 December 2016

शिक्षणाचे दिवस


*शिक्षणाचे दिवस*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*(ही कवीता माझ्या बाबतीत सत्य आहे*)
आई,
मी तुला सोडुन शिक्षणासाठी 
दुर गावी निघून आलोय 
तुझी सारखीच
मला आठवण येते.

आई,
ईतभर पोटासाठी
तुला किती झगडावं लागतं 
माझ्या शाळसाठी 
दुसर्याच्या शेतात दिवसभर 
उन्हात काम करावं लागतं.

आई,
मेसचा डबा मिळतोय बाराला 
तोपर्यंत पोट जातय 
भावाच्या भाराला.

आई,
शिक्षण घेताना माझ्या 
पोटाची आबदा होतेय गं
पण तुला मी असं 
कधीच नाही सांगणार
कारण तु माझाच विचार 
करत रडत बसशील.

मला तुला रडवायचं नाही
शाळा मास्तर होऊन 
तुला हसवायचं आहे.

रानातल्या ढेकळात
तुझ्या कष्टाळलेल्या घामाला 
सुखाचं फळ आणायचं आहे.

*(ही कवीता वाचून माझ्या वेड्या मायला कुणीच सांगू नका बर का? ती खुप हळव्या मनाची आहे.)*
                
                 वेडा कवी 
             सत्यवान कांबळे
          तारीख:-18/11/2016 
          मो.नं:-8600243781 
       मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुडे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/12/blog-post.html 

Tuesday 6 December 2016

चारोळी:21

तू स्वप्नात माझ्या येऊनी
रात्रभर माझ्या जवळ बसतेस
अलगद जेंव्हा उघडतात पापन्या
तेंव्हा मात्र तू कुठेच नसतेस?

          वेडा कवी
      सत्यवान कांबळे

Tuesday 15 November 2016

चारोळी:20

ती आज माझ्या कडं
रागा रागानचं बगत होती
रागानेच का असेना ती
मला आपलस करत होती

         वेडा कवी
     सत्यवान कांबळे

Saturday 5 November 2016

*आम्ही गावाकडली लेकरं* सदर ही कवीता माझी आहे

           नमस्कार
         कवी मित्रानो

माझी *आम्ही गावाकडली लेकरं*ही कवीता  बालाजी मोरे  या नावाने फिरते आहे.

माझ्या मते ज्यांच्यात लिहिण्याची कुवत नसते तेच लोक इतरांची कवीता चोरतात.
सदर माझी ही कवीता
http://satyawankamble.blogspot.com/2016/10/blog-post_10.html   ह्या website वर रजिस्टर आहे।
        तुमचा वेडा
         कवी मित्र
     सत्यवान कांबळे

Tuesday 1 November 2016

स्त्री-भ्रूण हत्या

*स्त्री-भ्रूण हत्या*
➖➖➖➖➖➖➖➖➖
(गर्भाशयातील बाळ आपल्या आईला हाक मारून मला जन्माला येऊ दे मला मारू नको गं आई मला मारू नको अशी आर्द किंकाळी मारत आहे.)

आई;
मी तुझी मुलगी बोलतेय
मला शिकुन सावरून
मोठं व्हायचं आहे गं
पण मला गर्भातल्या गर्भात
मारू नकोस गं आई
मला मारू नकोस.

आई;
दादा हा वंशाचा
दिवा जरी असला तर
त्या दिव्याची वात
मीच आहे

आई;
मला जन्माला आल्यावर
टाळ मृदूंग हातामध्ये घेऊन
विठ्ठला- विठ्ठला करत
पंढरीच्या वारीला जायाचं आहे गं

आई;
मला जन्माला आल्यावर
सानिया मिर्झा,
रजिया सुलतान
किरण बेदी,
सायना नेहवाल
यांच्या सारख व्हायचं आहे गं

आई;
मला जन्माला आल्यावर
आपल्या आज्जीकडून
चिऊ आणी काऊची
गोष्ट ऐकायची आहे

आई;
पक्षी एकाच घरट्यात
कशी गुण्या गोविंदाने राहतात
ते मला बगायचं आहे गं
पण मला मारू नको गं आई
मला मारू नकोऽऽऽऽऽ

आई;
मी तुम्हाला दिवाळीला कधीच
नवीन कपडे मागणार नाही
खाऊसाठी हट्ट करणार नाही

पण,
मला गर्भातल्या गर्भात
मारू नको गं आई
मला ही हे जग पाहु दे

मला पण जन्माला येऊ दे
मला पण जन्माला येऊ दे
        
         *वेडा कवी*
     *सत्यवान कांबळे*
     तारीख:-01/11/2016
  , मो.नं:-8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.

Monday 31 October 2016

"शौचालय बांधा घरोघरी"सदर ही कवीता माझी आहे

30/10/2016 रोजी लिहली गेलेली *शौचालय बांधा घरोघरी* ही माझी कवीता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालूक्यातील जुनोनी गावातील गावचे उपसरपंच अरविंदजी पाटील यांच्या नावाने फिरते आहे. काही ठिकाणी निनावी फिरते आहे. ही सदर माझी कवीता Satyawankamble.Blogspot com या लिंकवर रजिस्टर आहे.तुम्हाला अशा प्रकारे कवीता आढळली तर ही कवीता *वेडा कवी सत्यवान कांबळे* यांची आहे अशी धडकावून सांगा.
              साहेब सरपंच आणी उपसरपंच यांना गावातील प्रथम नागरिक म्हणून ओळखले जाते.तुम्हीच लोकांनी अशा प्रकारे क्रत्य केल्यास आपलं गाव कधी हागणदारी मुक्त होणार.आणी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारत सुंदर भारत हा कानमंत्र जगाच्या पाठीवर कधी नेऊन ठेवणार.
पुराव्या साठी कवितेचा blog id

http://satyawankamble.blogspot.in/2016/10/blog-post_30.html?m=1

Sunday 30 October 2016

चारोळी:19

तु दिसली की
मन भरभरून यायचं
तु नाही दिसली की
मग कळीज चारंऽऽऽऽऽ करायचं
                  
        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

चारोळी:18

मुलगा हा वंशाचा दिवा जरी असला
मुलगी त्या दिव्याची वात असते
मुलगा घराचा वंश वाढवतो
मुलगी नवे घर बसवते
    
       वेडा कवी
  सत्यवान कांबळे

चारोळी:17

मी फक्त कवीता
करण्यासाठीच वेडा आहे
अन सखे यात
तुझा ही सहभाग थोडा आहे.
       
        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

चारोळी:16

पणती आहेस तू
पणती सारखीच वाग
जास्त तापलीस तर
होतील तुझे चार भाग

      वेडा कवी
  सत्यवान कांबळे
मो.नं:-8600243781

 

शौचालय बांधा घरोघरी

*शौचालय बांधा घरोघरी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*या कवीतेतून कवी सर्वांना  शौचालय बांधा घरोघरी आरोग्य नांदेल तुमच्या दारोदारी  असा  लाख मोलाचा टिकात्मक संदेश देतो.*

सगळ्यांनी मिळून
निर्धार करू
आपला देश
हागणदारी मुक्त करू

नरेंद्र मोदी यांचा 
स्वच्छ भारत 
सूंदर भारत 
हा कानमंत्र
जगाच्या पाठीवर नेऊन ठेवू

सगळ्यांना सांगत फिरतोस 
माझी बायको लयऽऽऽऽऽ भारी 
पण मर्दा 
शौचालय नाही रं तुझ्या दारी

मेव्हणी आली की;
तिला आणतोस चांगला आहेर 
पण तुझी बायको जाते 
शौचालयास बाहेर

जीवण जगताना  
मोठमोठ्या गोष्टींची करतोस आशा 
घरी शौचालय बांधायची
कधीच करीत नाहीस तू भाषा

राहायला माडी 
पोराला गाडी 
बायकोला साडी 
दररोज वापरायला नाही 
शौचालय घरोघरी

म्हणून मी सांगतो;
शौचालय बांधा घरोगरी
आरोग्य नांदेल
आपल्या दारोदारी

आता मी मनाला;
पक्का निर्धार घेणार 
माझं गाव हगणदारी मुक्त होणार
आणी माझा देश 
जगात नावा रूपाला येणार.
             🌹🌹🌹
               *वेडा कवी*
           *सत्यवान कांबळे*
      तारीख:-30/10/2016 
      मो.नं:-8600243781 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
  ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे. आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/10/blog-post_30.html

Friday 28 October 2016

तू आणि मी

*तू आणि मी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तू आणि मी
एकाच वर्गात शिकायचो ...
तू मला खूप आवडायची 
म्हणुन मी मागे बसायचो...

सारखं तुझ्याच नावाचं वादळ
माझ्या मनात फिरायचं
माझं तुझ्यावर प्रेम आहे 
असं तुला विचारावं वाटायचं...

पण तुला असं विचारायचं 
मला कधीच धाडस नाही झालं 
कारण मला खूप भीती वाटायची...

एक दिवस मी तुला 
धाडस करून विचारलं 
माझं तुझ्यावर प्रेम आहे...

त्यावेळेस तू मला 
विचार करून सांगेन
असं बोलली होतीस...

चार दिवस मी 
तुझ्याच गुगींत वावरत होतो
आणि तू मला एक दिवस
माझ्या प्रेमाला होकार दिला...

दोघांनी एकमेकांवर
जिवापाड प्रेम केलं
पण आपल्या गोड प्रेमाला 
नियतीने नाही हेरलं...

तूझी आणि माझी 
एक ना एक दिवस 
ताटातुट होणार आणि
तू मला कायमची सोडुन जाणार 
हे मला नक्की माहीत होतं 
तरी पण माझं वेडं मन 
तुझ्यावर प्रेम करायचं
आणि शेवटी तू मला 
सोडून गेलीस...

माझी शेवटची एकच इच्छा होती 
तुला भरल्या डोळ्यांनी बघावं 
मन मोकळ्या गप्पा माराव्या 
पण तू मला सोडून गेलीस 
आणि माझी शेवटची इच्छा अधुरी राहिली.
              🌹🌹🌹
                *वेडा कवी*
            *सत्यवान कांबळे*
         मो.नं:-8600243781 
   मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कविता खालील लिंकवर  रजिस्टर केली आहे. आवडली तर कवीच्या नावासहित पुढे पाठवून वरील नंबरवर फोन करून बोलूही शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/10/blog-post_70.html

Thursday 27 October 2016

आली आली दिवाळी

आली आली दिवाळी
🎇🎆🌅🌄🌌🌃
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आली आली दिवाळी
चला करूया तिची तयारी
चिंगी आली
मंगी आली 
तंगी आली 
पिंटी आली 🎇🎆🌅
बंटी आली ।।

चिंगीने चिवडा केला 
मंगीने शंकरपाळे केले 
तंगीने जिलेबी केल्या 
पिंटीने लाडू केले🎇🎆🌅
बंटीने कंरज्या केल्या 
दादाने किल्ला बनवला ।।

आली आली दिवाळी
सगळ्यांनी मिळून 
फटाके उडवूया 🎇🎆🌅
दिवस मौज-मजेत घालवूया ।।

दिवाळीचा सन म्हणजे;
आमच्या आवडीचा सन  ।।

घरी आत्या आली,
मावशी आली,
ताई आली,
मामी आली,
काकी आली 🎇🎆🌅
आमची दिवाळी 
मौज-मजेत झाली ।।
       
       वेडा कवी
  सत्यवान कांबळे
मो.नं:-8600243781 
मु.पो.रड्डे ता. मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/10/blog-post_27.html

Monday 24 October 2016

तुझी आजही मला आठवण येते


आपण दररोज काॅलेजला यायचो
तु माझ्याकडे बघायची
मी तुझ्याकडे बघायचो
शेवटी तु मला सोडून गेलीस
तुझी आजही मला आठवण येते

काॅलेज भरलं की,
तु तुझ्या बॅचवर बसायची
मी माझ्या बॅचवर बसून
तुझं नाव टाकत बसायचो
शेवटी तु मला सोडून गेलीस
तुझी आजही मला आठवण येते

सरांनी विचारलेल्या प्रश्नाला
दोघं पण ओढाचढीने उत्तर द्यायचो
बाकीचे मुलं-मुली आपल्याकडे बगायची
शेवटी तु मला सोडून गेलीस
तुझी आजही मला आठवण येते

आपण असताना;
काॅलेज कट्टा खूप गाजायचा
आज गाजतोय का नाही
ते मला माहीत नाही

पुन्हा एकदा काॅलेजकडं जावसं वाटतय
खूप मौज मज्जा करावसं वाटतय
पण त्या ठिकाणी तु नाहीस
शेवटी तु मला सोडून गेलीस
तुझी आजही मला आठवण येते

काॅलेजमध्ये असताना खूप मज्जा यायची
सगळीजन मिळून कॅटीनला जायचो
मी बील देत असतांना तु माझ्याकडे बगायची
शेवटी तु मला सोडून गेलीस
तूझी आजही मला आठवण येते.

             वेडा कवी
        सत्यवान कांबळे
    तारीख:-24/10/2016
     मो.नं:-8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.

Monday 17 October 2016

माझा बा आणी बा आंबेडकर

*माझा बा आणी बा आंबेडकर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
दिसभर काम करून 
बा थकला हुता 
काम-काम म्हणून
वैतागला हुता...

म्या;
साळा सुटल्यावर घरी  गिलू 
पेपर असल्यामुळं मास्तरनी 
पेपराची फी मागीतली हूती.

म्या आबाला म्हणालू,
आबा;
मास्तरनी 2 रूपये 
पेपराची फी मागीतलीय...

आबा म्हणाला,
आरं पोरा 
आता पैसं नाहिती
पुन्हा दितू म्हणून 
सांग मास्तरला...

आबा घासभर खाऊन
हातरूणावर तिथच लवंढला

म्या मात्र,
रातभर इचार करत हुतू 
पेपरची फी नाही दिली तर 
मास्तर आपल्याला साळतनं
हाकलून देणार हाय...

पाट-पाटं;
बा कुणकूणत हुता
दिसभर काम करून
तापानं फनफनत हुता...

म्या मात्र सकाळी उठून
पेपरची फी न मागता 
तसच साळला गिलू
साळत मास्तरनी पेपराची फी 
नाही दिली म्हणून
साळच्या बाहेर हाकललं...

मास्तरनी बाहेर हाकलल्यावर
त्या दिशी बाहेर बसून 
दिसभर साळा शिकली 
त्यावेळेस मला 
बाबासाहेब आंबेडकर नावाच्या
बा ची आठवण आली...

माझ्या बा नं 
साळच्या बाहेर बसून साळा शिकली 
आणी जगाची राज्यघटना लिहली
बाहेर बसून शिकलेल्या साळवर
आज देशाची राज्यघटना चालतेय
त्या बा ला इसरून कसं चालणार.
             
            वेडा कवी
        सत्यवान कांबळे
  मो.नं:-8600243781 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहित पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://satyawankamble.blogspot.com/2016/10/blog-post_17.html

Friday 14 October 2016

माणसं आणी कणसं

ही कवीता नक्कीच काॅलेजच्या मुलांना आवडणार.
---------------------------------
शेतातल्या रान माळाची पाखरं
दिस मावळताना
उडाणटक्या करित
घरट्याकडे परतत होती.

सुगीची कामं उरकून
माय बा
टकूर्यावर कणसं घेऊन
घराकडे परतत होती.

पाखरांचा चिवचिवाट सुरू झाला
ढंगाचा गडगडाट सुरू झाला
विजाचा कडकडाट सुरू झाला
पावसाचा वर्षाव सुरू झाला.

कडब्याचा चिधांडा झाला
कणसाची नासाडी झाली
सरकार काय डोकावून बगेना
माझ्या माय बा चं
आठरा-विश्व दारिद्रय हटता हटेना.

कणसाचा वास उठला
झाडावरच्या पाखरांचा थवा उठला
माणसाची धावपळ उठली
गोठ्यातली जनावरं उपासमारीनं उठली.

त्यावेळची माणसं
आत्ताची ज्वारीची कणसं
ही ज्वारीची कणसं
बाजरीच्या कणसाला जाऊन भिडू लागली
मग बाजरीचं कणीस पण
हळूहळू डुलु लागलं.

डुलता-डुलता कलियुगातल्या,
दोन्ही कणसांचा सहवास वाढला
सहवासाचं रूपांतर
आगळ वेगळं बोलण्यात झालं
आगळ वेगळं बोलण्याचं रूपांतर प्रेमात झाल.

बोलता-बोलता;
आयुष्याचं भान हरपून गेली
आयुष्याची भाकर करपून गेली
आयुष्याला वेगळं वळण लावून गेली
कलियुगातल्या काॅलेजची कणसं
समाजाला सोडून गेली.

जाता-जाता
आयुष्याला वेड लावून गेली
आयुष्याला हुरहूर लावून गेली
चार-चौघांचे मने जिकून गेली.
       
        वेडा कवी
     सत्यवान कांबळे
तारीख:-15/10/2026
मो.नं:-8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.

Wednesday 12 October 2016

प्रेमाच्या जोड्या

     प्रेमाच्या जोड्या
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ही कवीता नककीच
शाळेच्या मुलांना आवडणार 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
रविवारची सुट्टी हुती 
आबा मला म्हणाला 
आरं पोरा मळ्यात
बाजरी आलिया काढायला 
चल जाऊ बाजरी काढायला...

मी म्हणालो आबाला,
आबा मी कधीच काम नाही केल 
माझ्या हाताला फोडं येत्याली...

आबा मला म्हणाला,
आर पोरा असू दी चल 
असं म्हणून आबा आणी माय 
मळ्यात निघून गेले...

मी मात्र;
उशिरना मळ्यात निघालू 
जाता-जाता शेजारच्या तात्याचं शात लागलं 
तात्यानं आपल्या शेतात 
भुईमुगाच्या शेंगा पेरल्या हुत्या 
मनात आलं चार याल उपसावं
आणी खात-खात आबाकडं जावं...

म्या बी;
भीत-भीत चार याल उपासलं 
आणी तात्याच्या बांधालाच खात बसलू
माझी नजर तात्याच्या बांधाला
असलेल्या केकताडीकडं गिली...

त्या केकताडीवर गावातल्या पोरांनी,
लव चिन काढून
आपापल्या जोडया टाकल्या हूत्या
मला मात्र त्या दिशी सगळ्यांची नावं दिसली 
मी सगळ्यांची नावं वाचली
त्या दिशी मला कळालं 
कुणाचं कूणासंग हाय...

मला मनातल्या मनात वाटलं 
लेका लेका लेका लेका लेका 
अशी नावं टाकायला 
ह्यानां भिती वाटत नशील का?

पुन्हा माझ्या मनात इचार आला 
आरं कुणाला भ्यायचाय 
एकमेकावर पिरेम हाय पिरेम...

मला बी वाटलं,
आपलं बी नाव टाकूया 
पुन्हा माझ्या मनात इचार आला 
पर कुणासंग टाकायचं...

पुन्हा माझ्या मनात 
एक येगळाच इचार आला 
त्या गावातल्या
कवी नावाच्या पुरीसंग टाकूया 
कारण कुणाला कळणार नाय 
आपलं बी नाव कवी हाय...

म्या बी तात्याच्या बांधावरून 
तावातावानच उठलू 
केकताडीचा काटा मोडला
लव चिन काढलं
हिकडं एक बाण अन्
तिकडं एक बाण चिन काढलं
एकात कवी अन्
दुसर्यात सत्यवान टाकलं

म्हणून मी कवी सत्यवान
म्हणून मी कवी सत्यवान.
          
          वेडा कवी
      सत्यवान कांबळे
तारीख:-25/03/2015
मो.नं:-8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कविता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com

Monday 10 October 2016

आम्ही गावाकडली लेकरं

*Friendship Day निमित्त ही कवीता तुमच्यासमोर सादर करतोय.आज सगळे जुने मित्र-मैत्रिणी मला सोडून गेले पण त्यांच्या आठवणी आजही माझ्या ह्रदयात जपून आहेत.त्या आठवणी मला अशाच जपून ठेवायच्या आहेत.ही कवीता माझ्या सर्व मित्र- मैत्रिणीना समर्पित करतोय.*

*आम्ही गावाकडली लेकरं*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*आम्ही गावाकडली लेकरं*
आम्हाला आमची मायभूमीच प्यारी 
आम्हाला मातीत खेळायलाच आवडायचं 
आणी तो भातूकलीचा खेळ 
वेगळ्याच गोष्टीत रंगायचा

*आम्ही गावाकडली लेकरं*
आमची आज्जी आम्हाला
चिऊ आणी काऊची गोष्ट सांगायची
ती गोष्ट आम्ही कुतूहलाने ऐकायचो 
चिऊ आणी काऊ आमच्या
शेतात ज्वारीची दाणं खायची

*आम्ही गावाकडली लेकरं*
माझा बाप त्या बळीराजा बरोबर
शेतामध्ये राब राब राबायचा
त्या कष्टाळलेल्या घामाचा 
सुंगधच न्यारा असायचा

संध्याकाळी,
माय भाकर केल्यावर 
आम्ही मिळून जेवायचो
जेवता-जेवता माय बा 
हळूच कुजबूजू लागली
आता आपण पोराला शाळेत धाडूया

जसं पावसाळ्याच्या दिसात 
आभाळ धाडsssss करावं 
तसं ते बोलणं ऐकून 
माझं काळीज धाडंsssss केलं

माझ्या माय बा नं 
सगळी स्वप्नं उराशी बाळगून 
मला शाळेत धाडलं 
आणी मी शाळेत जाऊ लागलो

जशी फाटकी कापडं 
सुई-दोरीनं शिवावं 
तसी मी आयुष्याची 
एक-एक स्वप्ने मी शिवू लागलो

आयुष्याची स्वप्ने शिवता-शिवता 
कवी मनाची भाषण करण्याची
स्वप्ने मला पडू लागली 
ती सगळी स्वप्ने ऊराशी बाळगून 
मी कवी मनाची भाषणं करू लागलो

कवी मनाची
भाषणं करता-करता 
कलीयुगातल्या काॅलेजच्या तरूणाईचे
मने मी जिकूं लागलो

*आम्ही गावाकडली लेकरं*
आम्हाला आमची मायभूमीच प्यारी 
आम्हाला मातीत खेळायलाच आवडायचं
आणी तो भातूकलीचा खेळ
वेगळ्याच गोष्टीत रंगायचा

शाळेमूळं मित्रत्वाच्या पाखरांची
चागंलीच ओळख झाली
मित्राच्या प्रेमात बिलगललेली पाखरं 
जुनं शिक्षणाचं घरटं सोडून 
नवीन शिक्षणाच्या घरट्याकडे जाताना
एकमेकाच्या डोळ्यात दु:खाचा महापूर आला

दु:खाचा महापूर,
सगळ्यांनी हुदक्यानी फोडला 
महापुराचा हुंदका फोडून 
आयुष्याची शिदोरी गुंफण्यासाठी

*एकमेकापासून दूर निघून गेले*
*एकमेकापासून दूर निघून गेले.*
         🌹🌹🌹
           *वेडा कवी*
      *सत्यवान कांबळे*
  मो.नं:-8600243781
तारीख:-11/10/2016 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुडे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/10/blog-post_10.html

Saturday 8 October 2016

चारोळी:15

तूला काय वाटतं गं
मी तूझ्याकडे बघतोय
मी तुझ्याकडे नाही तर
तूझ्यातल्या मी माझ्याकडे बगतोय

        वेडा कवी
    सत्यवान कांबळे

Wednesday 5 October 2016

आयुष्याच्या वळणावर


➖➖➖➖➖➖➖➖➖
आयुष्याच्या वळणावर
➖➖➖➖➖➖➖➖➖
जीवन खूप सुंदर आहे
ते आंनदाने जग
प्रेमाने जग
हळव्या मनाने जग...

जगता-जगता
कोणाच्या हृदयात
आयुष्याचं घर करून
राहता येतयं का बग...

जीवन म्हणजे,
लहान बाळाची खेळणी,
नवरा बायकोचा संसार
आयुष्याचा सुंदर रथ...

तुझं लाख मोलाचं प्रेम
कोणाला देता येतय का बग
घेता येतय का बग
प्रेमाने जग जिंकता येतय का बग...

आपलं प्रेम बहरत असतानाच
मी दु:खी अंतकरणाने
शेवटी तुझा निरोप घेतला...

त्या वेळेस तु मला बघुन
दिवसभर रडली होतीस 
रडता-रडता
मला दुःखी अंतकरणाने
बोलुन गेली होतीस...

आयुष्याला सांभाळ
विचारांना सांभाळ
तुझ्या या हळव्या मनाला
कधीच त्रास करून घेऊ नकोस

आपल्या काॅलेजच्या ग्रुप मधला फोटो
तुझ्या घरामध्ये लावून घे
कारण घरातून बाहेर येता जाता
मी तुला नक्कीच त्या फोटोमध्ये दिसेन...

या जन्मी मी तुझी
नाही होऊ शकले
पुढच्या जन्मी 
नक्कीच मी तूझी होईन
असं म्हणून तू
माझा निरोप घेतलास...

ज्या ठिकाणी तू मला
पहिल्यांदा भेटलीस
त्याच जुन्या वळणावरती
आज मी हातामध्ये गुलाबाचं
फुल घेऊन उभा आहे...

कारण,
तू मला
कोणत्या ना कोणत्या
रूपाने भेटशील
याच आशेने मी उभा आहे...

पण त्या ठिकाणी
तु मला कधीच दिसत नाहीस
त्या प्रेमाच्या जुन्या वळणावरती
मला एक वेगळच
रोज नवीन जोडपं दिसतं...

त्यावेळेस माझ्या तोंडातून
शब्द फुटेनासे होतात
मग मी तुझा
विचार करत घरी येत असताना
वाटेमध्ये मला एक
वेगळाच प्रश्न पडतो...

ती कुठे गेली?
मी कुठे गेलो?
माझं हळवं मन कुठे गेलं?
तिच्या आयुष्याला वेड लावणारे
माझे विचार कुठे गेले?

हा सगळा विचार
करत असताना
घर कधी येतय
हे माझं मलाच कळत नाही...

शेवटी मी तुला एवढेच म्हणेन
आयुष्याच्या नव्या वळणावर
तु जात असताना
जुन्या वळणावरच्या
गावाकडल्या मातीतल्या
तुझ्या त्या हळव्या मनाच्या मित्राला
कधी सुध्दा विसरू नकोस...

दिल्या घरी तू सूखी रहा
दिल्या घरी तू सूखी रहा.
          
          वेडा कवी
      सत्यवान कांबळे
   मो.नं:-8600243781
तारीख:-05/10/2016
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/10/blog-post_19.html
➖➖➖➖➖➖➖➖➖