Wednesday 5 October 2016

आयुष्याच्या वळणावर


➖➖➖➖➖➖➖➖➖
आयुष्याच्या वळणावर
➖➖➖➖➖➖➖➖➖
जीवन खूप सुंदर आहे
ते आंनदाने जग
प्रेमाने जग
हळव्या मनाने जग...

जगता-जगता
कोणाच्या हृदयात
आयुष्याचं घर करून
राहता येतयं का बग...

जीवन म्हणजे,
लहान बाळाची खेळणी,
नवरा बायकोचा संसार
आयुष्याचा सुंदर रथ...

तुझं लाख मोलाचं प्रेम
कोणाला देता येतय का बग
घेता येतय का बग
प्रेमाने जग जिंकता येतय का बग...

आपलं प्रेम बहरत असतानाच
मी दु:खी अंतकरणाने
शेवटी तुझा निरोप घेतला...

त्या वेळेस तु मला बघुन
दिवसभर रडली होतीस 
रडता-रडता
मला दुःखी अंतकरणाने
बोलुन गेली होतीस...

आयुष्याला सांभाळ
विचारांना सांभाळ
तुझ्या या हळव्या मनाला
कधीच त्रास करून घेऊ नकोस

आपल्या काॅलेजच्या ग्रुप मधला फोटो
तुझ्या घरामध्ये लावून घे
कारण घरातून बाहेर येता जाता
मी तुला नक्कीच त्या फोटोमध्ये दिसेन...

या जन्मी मी तुझी
नाही होऊ शकले
पुढच्या जन्मी 
नक्कीच मी तूझी होईन
असं म्हणून तू
माझा निरोप घेतलास...

ज्या ठिकाणी तू मला
पहिल्यांदा भेटलीस
त्याच जुन्या वळणावरती
आज मी हातामध्ये गुलाबाचं
फुल घेऊन उभा आहे...

कारण,
तू मला
कोणत्या ना कोणत्या
रूपाने भेटशील
याच आशेने मी उभा आहे...

पण त्या ठिकाणी
तु मला कधीच दिसत नाहीस
त्या प्रेमाच्या जुन्या वळणावरती
मला एक वेगळच
रोज नवीन जोडपं दिसतं...

त्यावेळेस माझ्या तोंडातून
शब्द फुटेनासे होतात
मग मी तुझा
विचार करत घरी येत असताना
वाटेमध्ये मला एक
वेगळाच प्रश्न पडतो...

ती कुठे गेली?
मी कुठे गेलो?
माझं हळवं मन कुठे गेलं?
तिच्या आयुष्याला वेड लावणारे
माझे विचार कुठे गेले?

हा सगळा विचार
करत असताना
घर कधी येतय
हे माझं मलाच कळत नाही...

शेवटी मी तुला एवढेच म्हणेन
आयुष्याच्या नव्या वळणावर
तु जात असताना
जुन्या वळणावरच्या
गावाकडल्या मातीतल्या
तुझ्या त्या हळव्या मनाच्या मित्राला
कधी सुध्दा विसरू नकोस...

दिल्या घरी तू सूखी रहा
दिल्या घरी तू सूखी रहा.
          
          वेडा कवी
      सत्यवान कांबळे
   मो.नं:-8600243781
तारीख:-05/10/2016
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/10/blog-post_19.html
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment