Wednesday 5 October 2016

प्रिये

*प्रिये*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*(प्रियकराला आपली प्रियशी सोडून जात असताना प्रियकराच्या तोडांतून बाहेर पडलेले शब्द मी तुमच्या समोर मांडतोय)*

मला सोडून 
जाऊ नकोस ग जानू 
तु तर आहेस 
या मल्हाराची बानू

तुझं आणी माझं
नातं किती जवळचं
आणी त्या नात्याला 
एवढं दूर का ठेवायचं

जीवणाच्या प्रत्येक वळणावर
मला अनेक जण भेटतील 
पण तुझ्या सारखी
कधीच नाही भेटणार

दूर जगाच्या पल्याड जाऊन 
आपण दोघानी प्रेम केलं 
त्या आपल्या प्रेमाला 
समाजानी नाही हेरलं

आपलं गोड जीवाचं नातं 
किती थाटामाटात उभारलं
त्याला मध्येच असं 
वेड्यावाणी का मोडायचं

मोडायचं असेल तर मोड
तोडायचं असेल तर तोड 
पण तुझ्या गोड जीवाला 
आणी माझ्या हळव्या मनाला 
आवरून आणी सावरून.
         🌹🌹🌹
           *वेडा कवी*
      *सत्यवान कांबळे*
मो.नं:-8600243781 
तारीख:-05/10/2016 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2016/10/blog-post_5.html

No comments:

Post a Comment