Wednesday 12 October 2016

प्रेमाच्या जोड्या

     प्रेमाच्या जोड्या
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ही कवीता नककीच
शाळेच्या मुलांना आवडणार 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
रविवारची सुट्टी हुती 
आबा मला म्हणाला 
आरं पोरा मळ्यात
बाजरी आलिया काढायला 
चल जाऊ बाजरी काढायला...

मी म्हणालो आबाला,
आबा मी कधीच काम नाही केल 
माझ्या हाताला फोडं येत्याली...

आबा मला म्हणाला,
आर पोरा असू दी चल 
असं म्हणून आबा आणी माय 
मळ्यात निघून गेले...

मी मात्र;
उशिरना मळ्यात निघालू 
जाता-जाता शेजारच्या तात्याचं शात लागलं 
तात्यानं आपल्या शेतात 
भुईमुगाच्या शेंगा पेरल्या हुत्या 
मनात आलं चार याल उपसावं
आणी खात-खात आबाकडं जावं...

म्या बी;
भीत-भीत चार याल उपासलं 
आणी तात्याच्या बांधालाच खात बसलू
माझी नजर तात्याच्या बांधाला
असलेल्या केकताडीकडं गिली...

त्या केकताडीवर गावातल्या पोरांनी,
लव चिन काढून
आपापल्या जोडया टाकल्या हूत्या
मला मात्र त्या दिशी सगळ्यांची नावं दिसली 
मी सगळ्यांची नावं वाचली
त्या दिशी मला कळालं 
कुणाचं कूणासंग हाय...

मला मनातल्या मनात वाटलं 
लेका लेका लेका लेका लेका 
अशी नावं टाकायला 
ह्यानां भिती वाटत नशील का?

पुन्हा माझ्या मनात इचार आला 
आरं कुणाला भ्यायचाय 
एकमेकावर पिरेम हाय पिरेम...

मला बी वाटलं,
आपलं बी नाव टाकूया 
पुन्हा माझ्या मनात इचार आला 
पर कुणासंग टाकायचं...

पुन्हा माझ्या मनात 
एक येगळाच इचार आला 
त्या गावातल्या
कवी नावाच्या पुरीसंग टाकूया 
कारण कुणाला कळणार नाय 
आपलं बी नाव कवी हाय...

म्या बी तात्याच्या बांधावरून 
तावातावानच उठलू 
केकताडीचा काटा मोडला
लव चिन काढलं
हिकडं एक बाण अन्
तिकडं एक बाण चिन काढलं
एकात कवी अन्
दुसर्यात सत्यवान टाकलं

म्हणून मी कवी सत्यवान
म्हणून मी कवी सत्यवान.
          
          वेडा कवी
      सत्यवान कांबळे
तारीख:-25/03/2015
मो.नं:-8600243781
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कविता खालील लिंकवर रजिस्टर केली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com

No comments:

Post a Comment