Monday 9 January 2017

ती सध्या काय करते...?

ती सध्या काय करते...?
➖➖➖➖➖➖➖➖➖
ती सध्या काय करते...?
तर आजही
गावात असो वा शहरात
फक्त आणि फक्त
कष्टच करते

सकाळी लवकर उठते 
जनावराचं शाण-घाण काढते 
भाकर-तुकडा करते 
आणी बाबळीच्या झाडाखाली विसावलेल्या 
बापाला भाकरी नेऊन देते

ती सध्या काय करते...?
डोक्यावर बोचकं घेते 
हातामध्ये पिशवी घेते 
काकेत लेकरू घेते 
कोणीतरी वाढलेली शिळी भाकर 
आणी त्यावर लावलेली चटणीचा ठेसा 
खात-खात केसावरती फूगं, सुया, बिबं
म्हणत-म्हणत गावो-गावी फिरते

ती सध्या काय करते...?
नोकरी करते 
चाकरी करते
लेकरा-बाळांच्या शिक्षणासाठी 
दिवसभर उन्हात काम करते

ती सध्या काय करते...?
दुसर्याची धुणी-भांडी करते 
हाॅटेलात काम करते
रेल्वे-स्टेशनवर न्यूज पेपर विकते
दिवस मावळताना झोपडीकडे येते

ती सध्या काय करते...?
निवडणूकीला उभी राहते 
निवडून येते 
तिचा कारभार तिचा नवरा पाहतो 
सही कर म्हणील त्या ठिकाणी सही करते.

ती बिचारी माय, 
अजून बरेच काय करते 
ते कुणालाच दिसत नाही 
अन शब्दात बसेल एवढं 
मलाही मांडता येत नाही
आणि अजूनहि शोध बाकी आहे 
ती सध्या काय करते...?

पण,
मला आज एक प्रश्न पडला आहे 
तिच्या डोक्याला लावायला तेल नसते 
ती एवढी धडपड कुणासाठी करते?

             वेडा कवी
        सत्यवान कांबळे
       तारीख:-09/01/2017
     मो.नं:-8600243781 
मु.पो.रड्डे ता.मंगळवेढा जि.सोलापूर
ही कवीता खालील लिंकवर रजिस्टर कली आहे.आवडली तर कवीच्या नावासहीत पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
http://satyawankamble.blogspot.com/2017/01/blog-post_9.html
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment